---Advertisement---

टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताची पहिलीच लढत पाकिस्तानविरुद्ध; अशी असेल स्पर्धेची रूपरेखा

---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने संपल्यानंतर,येत्या १७ ऑक्टोबर पासून आयसीसी टी -२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा थरार पहायला मिळणार आहे. या स्पर्धेतील सामने युएई आणि ओमान या देशांमध्ये पार पडणार आहे. नुकताच आयसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार या स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान संघाविरुद्ध होणार आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमधील लढत पाहण्यासाठी दोन्ही देशातील चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. दोन्ही देशातील अंतर्गत वादांमुळे हे दोन्ही संघ द्विपक्षीय मालिका खेळताना दिसून येत नाही. परंतु, आयसीसीच्या स्पर्धांमध्ये या दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत असते. यंदा टी -२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना पाकिस्तान संघाविरुद्ध होणार आहे.त्यामुळे चाहते हा सामना पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतील.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघ टी२० क्रमवारीत पहिल्या ८ क्रमांकामध्ये असल्याने सुपर १२ फेरीसाठी थेट पात्र ठरले आहेत.

या स्पर्धेची सुरुवात १७ ऑक्टोबरला होणार असून १४ नोव्हेंबरला या स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील पहिल्या फेरीत पात्रता सामने खेळले जातील. ज्यामधे ८ संघ सुपर १२ फेरीसाठी पात्र ठरण्यासाठी खेळतील. तसेच मुख्य सुपर १२ फेरीत प्रवेश करण्यासाठी बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड,  नेदरलँड, स्कॉटलंड, नामीबिया, ओमान आणि पापूआ न्यू गिनी या ८ संघात ही पहिली फेरी पार पडणार आहे.

सुपर १२ फेरीसाठी गतविजेते वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांचा पहिल्या गटात समावेश आहे. या गटात पहिल्या फेरीतून पात्र ठरणारे २ संघ सामील होतील. तसेच सुपर १२ फेरीच्या दुसऱ्या गटात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे. तसेच या गटातही पहिल्या फेरीतून पात्र ठरणारे २ संघ सामील होतील.

यंदा टी-२० विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भारताला देण्यात आले आहे. ही स्पर्धा भारतात आयोजित करण्यात येणार होती. परंतु, कोरोनाची तिसरी लाटेची शक्यता पाहता हे सामने, युएई आणि ओमानमध्ये खेळवण्यात येणार आहेत.(India vs Pakistan match is on 24th October reserve day for semi-finals and finals, click here to know the full schedule)

उपांत्यफेरीसाठी आणि अंतिम फेरीसाठी राखीव दिवस

आयसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, १० नोव्हेंबर रोजी या स्पर्धेतील उपांत्य फेरीतील पहिला सामना खेळला जाणार आहे. तर उपांत्यफेरीतील दुसरा सामना ११ नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. दोन्ही सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. तसेच या स्पर्धेतील अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी दुबईमध्ये पार पडणार आहे. हा सामना काही कारणास्तव नाही झाला तर, १५ नोव्हेंबर रोजी अंतिम सामना खेळवला जाईल. हे सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होणार आहेत.

आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी असे असेल गटवारी
पहिली फेरी 
अ गट : श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड, नामीबिया
ब गट : बांगलादेश,स्कॉटलंड, ओमान,पापुआ न्यू गिनी

सुपर १२
गट १ : ऑस्ट्रेलिया,वेस्टइंडिज,इंग्लंड,दक्षिण आफ्रिका, अ १, ब २
गट २: भारत,पाकिस्तान,न्यूझीलंड, अफगाणिस्तान, ब १, अ २

टी२० विश्वचषकातील भारताचे सामने – 
२४ ऑक्टोबर – भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई
३१ ऑक्टोबर – भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुबई
३ नोव्हेंबर – भारत विरुद्ध अफगाणिस्तान, अबुधाबी
५ नोव्हेंबर – भारत विरुद्ध ब गटातील अव्वल संघ, दुबई
८ नोव्हेंबर – भारत विरुद्ध अ गटातील अव्वल संघ, दुबई

महत्त्वाच्या बातम्या – 

तिसऱ्या कसोटीत ‘या’ दिग्गज खेळाडूला मिळणार टीम इंडियातून डच्चू?

‘मोहम्मद सिराज हा रिषभ पंतचा गोलंदाजीमधला अवतार’, माजी भारतीय क्रिकेटरकडून कौतुक

क्रिकेटच्या पंढरीत विजयानंतर भारतीय चाहत्यांचा तुफान जल्लोष, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---