---Advertisement---

WORLD CUP 2023 । भारत-पाक सामन्याविषयी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरचा सामना रद्द, शेड्यूल बदलले

virat kohli shaheen afridi
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय यावर्षी होणाऱ्या वनडे विश्वचषक स्पर्धेच्या तयारीत कुठलीच कसर सोडताना दिसत नाहीये. आयसीसी विश्वचषक स्पर्धा क्रिकेटप्रेमींच्या दृष्टीने सर्वात महत्वाची असते, याचे यजमानपद यावर्षी भारतीय संघाकडे आहे. भारत आणि पाकिस्तान संघातील विश्वचषक सामना पाहण्यासाठी चाहते मागच्या मोठ्या काळापासून वाट पाहत आहेत. पण उभय संघांतील या सामन्याच्या वेळापत्रकात मोठा बदल झाल्याचे समोर येत आहे.

आयसीसीच्या वेळापत्रकानुसार 5 ऑक्टोबर रोजी वनडे विश्वचषक 2023ची सुरुवात होईल. भारतीय संघाला विश्वचषकातील आपला पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघासोबत खेळायचा आहे. भारत विश्वचषकातील आपला दुसरा सामना अफगाणिस्तानविरुद्ध 11 ऑक्टोबर रोजी खेळणार आहे. विश्वचषकातील तिसरा सामना भारतीय संघाल कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघासोबत (India vs Pakistan) खेळायचा आहे. वेळापत्रकानुसार हा सामना 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार होता. पण बीसीसीआय, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आयसीसी यांनी चर्चा केल्यानंतर हा सामना 14 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्याचे ठरवले आहे.

यावर्षी नवरात्र उस्तवाची सुरुवात 15 ऑक्टोबर रोजी होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये आयोजित केला गेला होता, ज्याठिकाणी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अशात भारत पाकिस्तान सामना आणि नवरात्र उत्सव या दोन गोष्टीं एकत्र आल्यामुळे शहरात सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होऊ शकत होता. तसेच रस्त्यांवर वाहतुकीच्याही अडचणी उद्भवू शकत होत्या. याच पार्श्वभूमीवर पीसीबी, बीसीसीआय आणि आयसीसीने विचारपूर्व हा सामना 15 ऐवजी14 ऑगस्ट रोजी आयोजित करण्याचे ठरवले आहे.

आयसीसी वनडे विश्वचषकातील पाकिस्तानचे वेळापत्रक –
6 ऑक्टोबर – विरुद्ध नेदरलँड्स, हैदराबाद
12 ऑक्टोबर – विरुद्ध श्रीलंका, हैदराबाद
15 ऑक्टोबर – विरुद्ध भारत, अहमदाबाद (14 ऑक्टोबर, भारत विरुद्ध पाकिस्तान)
20 ऑक्टोबर – विरुद्ध ऑस्ट्रेलिया, बेंगलोर
23 ऑक्टोबर – विरुद्ध अफगाणिस्तान, चेन्नई
27 ऑक्टोबर – विरुद्ध दक्षिण अफ्रीका, चेन्नई
31 ऑक्टोबर – विरुद्ध बांगलादेश, कोलकाता
4 नोव्हेंबर – विरुद्ध न्यूजीलैंड, बेंगलुरु

दरम्यान, 5 ऑक्टोबर रोजी सुरू होणारा विश्वचषक 19 नोव्हेंबर रोजी संपेल. एकून 10 संघ या स्पर्धेत सहभागी होणार असून राउंड रॉबिन पद्धतीने खेळळा जाईल. भारतातील 10 वेगवेगळ्या स्टेडियमवर विश्वचषकाचे सामने आयोजित केले जाणार आहेत.  (India vs Pakistan match rescheduled to October 14th from 15th.)

महत्वाच्या बातम्या –
सांघिक विजय! तिसऱ्या वनडेत वेस्ट इंडीज 200 धावांनी पराभूत, मालिका भारताच्या नावावर
विराट-रोहितला बाहेर बसवून टीम मॅनेजमेंट काय साध्य करतेय? सोशल मीडियावर चर्चेला ऊत

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---