---Advertisement---

ऑलिम्पिकमध्ये भारत-पाकिस्तान सामना होणार नाही! मोठी अपडेट आली समोर

On: बुधवार, जुलै 30, 2025 5:21 PM
---Advertisement---

आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यावरून विरोध सुरूच आहे. हा सामना रद्द करण्यात यावा, अशी मागणी दिवसेंदिवस तीव्र होत आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. 2028 ऑलिंपिकमध्ये (Olympics 2028) भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणारच नाही. यामागे आयसीसीच्या एका नियमाने मोठा अडथळा निर्माण केला आहे.

द गार्जियनच्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) ऑलिंपिकमधील क्रिकेट स्पर्धेसाठी पात्रता प्रक्रिया ठरवली आहे. या नव्या नियमानुसार आशियामधून फक्त एकच संघ ऑलिंपिकमध्ये सहभागी होऊ शकतो. यामुळे भारत किंवा पाकिस्तान यापैकी केवळ एकाच संघाला संधी मिळणार आहे.

द गार्जियनच्या माहितीनुसार, आयसीसीने प्रादेशिक (region-wise) आधारे संघांना ऑलिंपिकसाठी क्वालिफाय करण्याच्या प्रक्रियेला मंजुरी दिली आहे. आशिया, ओशिआनिया, युरोप आणि आफ्रिका खंडातील सर्वोच्च क्रमांकाच्या संघांना थेट ऑलिंपिकसाठी पात्रता मिळेल.

जर ही प्रक्रिया लागू झाली, तर ऑलिंपिकसाठी क्वालिफाय होणाऱ्या 6 संघांपैकी 4 संघ असे असू शकतात. भारत (आशिया), ऑस्ट्रेलिया (ओशिआनिया), दक्षिण आफ्रिका (अफ्रिका) आणि ग्रेट ब्रिटन (युरोप).

अमेरिकन खंडातून युएसए (USA) संघ यजमान देश म्हणून थेट ऑलिंपिकसाठी पात्र ठरणार आहे. मात्र ही स्थिती बदलू शकते, कारण आयसीसीने ऑलिंपिक सर्टिफिकेशनच्या नियमांअंतर्गत युएसए क्रिकेट बोर्डकडून राजीनामा मागितला होता. युएसए क्रिकेट बोर्डाने तो नाकारला असल्याने, युएसए संघाचा स्लॉट कोणत्यातरी कॅरेबियन देशाकडे जाऊ शकतो.

तसंच सहाव्या आणि शेवटच्या स्थानाबाबत अजूनही अनिश्चितता आहे. या स्थानासाठी क्वालिफिकेशन स्पर्धेचं आयोजन होण्याची शक्यता आहे.

ही नवी प्रणाली लागू झाल्यास, आशियामधून केवळ टी20 मध्ये सर्वोच्च क्रमांकाच्या संघालाच ऑलिंपिकमध्ये खेळण्याची संधी मिळेल. सध्या भारत केवळ आशियाच नाही तर संपूर्ण जगात टी20 प्रकारात नंबर-1 संघ आहे, तर पाकिस्तान आठव्या स्थानावर आहे.

अशा परिस्थितीत टीम इंडियालाच ऑलिंपिकसाठी थेट प्रवेश मिळेल, तर पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांसारख्या संघांना ऑलिंपिकमध्ये खेळता येणार नाही.

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डालाही हा नवीन नियम पटलेला नाही. सध्या न्यूझीलंड टी20 रँकिंगमध्ये चौथ्या स्थानावर आहे. मात्र ओशिआनिया खंडातून ऑस्ट्रेलिया हा सर्वोच्च क्रमांकाचा संघ आहे, जो सध्या दुसऱ्या स्थानावर आहे.

या प्रादेशिक क्वालिफिकेशन प्रणालीमुळे, रँकिंगमध्ये न्यूझीलंडपेक्षा खालच्या म्हणजे पाचव्या स्थानावर असतानाही दक्षिण आफ्रिकेला ऑलिंपिकमध्ये थेट प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे न्यूझीलंडसारखा उच्च रँकिंगमधील संघ देखील ऑलिंपिकबाहेर राहू शकतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---