मुंबई । इंग्लंडमध्ये ३०मे ते १४ जूलै दरम्यान होणाऱ्या विश्वचषकासाठी सर्वच संघांनी तयारी सुरु केल्या आहेत. यात भारत, पाकिस्तानसह सर्वच देश कसुन सराव करत आहे. पुढील ५ महिन्यात विविध मर्यादीत षटकांच्या मालिका आपल्याला पहायला मिळणार आहे.
सर्वांना माहित आहे की ५० षटकांच्या विश्वचषकात पाकिस्तानला भारताकडून सतत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. परंतु यावेळी पाकिस्तानचा संघ भारताला पराभूत करत इतिहास रचणार आहे, असा विश्वास पाकिस्तानचा माजी कर्णधार मोईन अलीने व्यक्त केला आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान हा बहुचर्चित सामना १६ जून रोजी मॅंचेस्टर, इंग्लंड येथे होणार आहे.
मोईन अलीने पाकिस्तान संघाचे जोरदार कौतूक करताना म्हटले आहे की यावेळी संघ पहिल्यांदाच भारताला पराभूत करु शकतो. याचे कारण म्हणजे पाकिस्तानची सध्याची टीम ही अतिशय प्रतिभावान आहे. या संघात खऱ्या अर्थाने विविधता आहे. तसेच कर्णधार सर्फऱाज अहमदचा संघातील अन्य खेळाडूंनी चांगला ताळमेळ आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–या दिवशी होणार ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
–संपुर्ण यादी- शिवछत्रपती पुरस्कारांची घोषणा, स्मृती मानधनासह या खेळाडूंना मिळणार पुरस्कार
–हिटमॅन रोहित शर्माबरोबर रिषभ पंतने विश्वचषकात सलामीला यावे
–भारताच्या सुरेश रैनासह हे ४ आहेत जाॅंटी रोड्सचे आवडते क्षेत्ररक्षक
–सुरेश रैनाच्या निधनाच्या सर्व बातम्या खोट्या, स्वत: रैनानेच केला खुलासा