आगामी आशिया चषक अवघ्या काही दिवसांवर आला आहे. 30 ऑगस्ट रोजी स्पर्धेचा पहिला सामना यजमान पाकिस्तान आणि नेपाळ संघात खेळला जाईल. भारतीय संघ आपला पहिला सामना 2 सप्टेंबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत खेळणार आहे. या सामन्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर अनेकांना उभय संघातील 2010 साली झालेल्या एका सामन्याचीही आठवण देखील येत असावी, ज्यामध्ये दिग्गज गौतम गंभीर याचा संयम सुटल्याचे पाहिले गेले होते.
2010 सालचा आशिया चषक श्रीलंकेत झाला होता. दांबुला स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील एक रंगतदार सामना खेळला जात होता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 49.3 षटकात 267 धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतासाठी गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि एमएस धोनी (MS Dhoni) यांनी अनुक्रमे 83 आणि 56 धावांची खेळी केली होती. धोनीसोबत 98 धांवाची भागीदारी झाली असताना गंभीर आक्रमक झाल्याचे पाहिले गेले. पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमल (Kamran Akmal) आणि गंभीर यांच्यात यावेळी मोठा वाद झाला होता.
एमएस धोनीने शांत केले वातावरण
अकमल यष्टीपाठी उभा असताना वारंवार पंचांकडे अपील करत होता, जे गंभीरला खटकले. याच कारणास्तव संयम सुटल्यानंतर तो थेट अकमलच्या अंगावर धावून गेला होता. वाद अधिक वाढू शकत होता, पण एमएस धोनी आणि इतर पाकिस्तानी खेळाडूंनी हस्तक्षेप केल्यामुळे परिस्थिती आटोक्यात आली. गंभीरने एका मुलाखतीत याविषयी स्पष्टीकरण दिले होते होते. त्याने सांगितल्याप्रमाणे, “मी चेंडू सोडला होता आणि अकमल मोठ्याने अपील करत होता. मी त्याला म्हणालो की चेंडू नाही लागला, अपील करून काहीच फायदा नाहीये.” गंभीरने असेही सांगितलेले की, “ड्रिंक्स ब्रेकमध्येचा या दोघांमधील वादाला सुरुवात झालेली.”
दरम्यान, या सामन्याचा विचार केला, तर भारतीय संघाने शेवटच्या षटकात विजय मिळवला. गंभीरप्रमाणेच हरभजन सिंगचा देखील शोएब अख्तरसोबत वाद झाला होता. मात्र हरभजनने अख्तरला तोंडी उत्तर देण्यापेक्षा बॅटने दिले. हरजनने शेवटच्या षटकार मारेलेल्या षटकाराच्या जोरावर भारताला विजय मिळवून दिला.
महत्वाच्या बातम्या –
वाद मिटला! स्वतः विराट म्हणाला, ‘बाबर जगात एक नंबर फलंदाज’, पहिल्या भेटीविषयी केला खुलासा
WIvIND: कोण ठरणार टी20 मालिकेचा विजेता? फ्लोरिडात आज रंगणार ‘ग्रॅंड फिनाले’