भारत आणि पाकिस्तानचे संघ टी-20 विश्वचषकात 9 जून रोजी आमनेसामने येणार आहेत. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जाील. दरम्यान, या सामन्यापूर्वी काही बातम्या समोर येत आहेत.
वास्तविक, भारत-पाकिस्तान सामना नासाऊ काउंटी क्रिकेट स्टेडियमवर ‘ड्रॉप-इन खेळपट्टी’वर खेळवला जाईल. यासाठी ऑस्ट्रेलियातील ॲडलेड येथून ‘ड्रॉप-इन खेळपट्टी’ आणण्यात आली आहे. परंतु ही ‘ड्रॉप-इन खेळपट्टी’ म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे का? ड्रॉप-इन खेळपट्टीची खासियत काय आहे? ड्रॉप-इन खेळपट्टी सोशल मीडियावर चर्चेचा विषय का बनत आहे? चला तर मग, आम्ही आज तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तर देणार आहोत.
ड्रॉप-इन खेळपट्टी म्हणजे काय?
ड्रॉप-इन खेळपट्टी म्हणजे अशी खेळपट्टी जी मैदान किंवा ठिकाणापासून दूर कुठेतरी बनविली जाते आणि नंतर स्टेडियममध्ये आणली जाते. याद्वारे एकाच मैदानाचा वापर विविध प्रकारच्या खेळांसाठी करता येतो. टी20 विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ नासाऊ काउंटी क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांमधील हा सामना ड्रॉप-इन खेळपट्टीवर खेळवला जाईल, जी ॲडलेड, ऑस्ट्रेलिया येथून आयात करण्यात आली आहे. क्रिकेटमध्ये ड्रॉप-इन खेळपट्टीचा सर्वप्रथम वापर पर्थ क्युरेटर जॉन मॅली यांनी वर्ल्ड सीरिज क्रिकेट सामन्यांसाठी केला होता. ही स्पर्धा 1970 मध्ये खेळली गेली होती.
ड्रॉप-इन खेळपट्टीमध्ये विशेष काय आहे?
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सामना सुरू होण्याच्या अवघ्या 24 तास आधी ड्रॉप-इन खेळपट्ट्या बसवल्या जाऊ शकतात. तसेच, सामना संपल्यानंतर त्या सहज काढता येतात. विशेषतः, ऑस्ट्रेलियामध्ये ड्रॉप-इन खेळपट्ट्या खूप लोकप्रिय आहेत. आता टी20 विश्वचषकासाठी न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी क्रिकेट स्टेडियममध्ये या खेऴपट्ट्या वापरल्या जाणार आहेत. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याव्यतिरिक्त या मैदानावर इतर अनेक खेळांचे सामनेही खेळले जाणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
3 असे खेळाडू ज्यांचा प्रथमच टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघात समावेश होऊ शकतो
टी20 वर्ल्डकपसाठी संजू सॅमसनला पहिली पसंती, पंत-राहुलला मिळणार डच्चू?
आयपीएल दरम्यानच टी20 वर्ल्ड कपसाठी रवाना होणार टीम इंडिया, तारीख आली समोर