---Advertisement---

आयपीएल दरम्यानच टी20 वर्ल्ड कपसाठी रवाना होणार टीम इंडिया, तारीख आली समोर

Team-India
---Advertisement---

आयपीएल 2024 संपल्यानंतर लगेचच टी20 विश्वचषक खेळला जाणार आहे. आयपीएलचा अंतिम सामना 26 मे रोजी खेळला जाईल. त्यानंतर 5 दिवसांनी म्हणजेच 1 जूनपासून टी20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. आता येथे प्रश्न उभा राहतो की, भारतीय खेळाडू फक्त पाच दिवसांच्या ब्रेक नंतर अमेरिकेत कसे जाणार? तर या संदर्भात एक रिपोर्ट समोर आला आहे. रिपोर्टनुसार, भारतीय खेळाडू आयपीएलच्या मध्येच वर्ल्डकपसाठी रवाना होणार आहेत.

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या रिपोर्टनुसार, भारतीय संघ 21 मे रोजीच अमेरिकेसाठी रवाना होणार आहे. या पहिल्या बॅच मध्ये ते खेळाडू जातील, ज्यांची टीम आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहचू शकलेली नाही. त्यामुळे आता हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे की, कोणते खेळाडू आयपीएलच्या मध्यात टी20 विश्वचषकासाठी रवाना होतील.

आयसीसीनं टी20 विश्वचषकासाठीच्या संघाची घोषणा करण्यासाठी 1 मे ची डेडलाईन दिली आहे. त्यामुळे भारतीय संघाची घोषणा येत्या दोन दिवसांत केली जाईल. विश्वचषकाच्या टीममध्ये अशा खेळाडूंना संधी दिली जाणार आहे, ज्यांची या आयपीएलमध्ये कामगिरी चांगली राहिली आहे.

भारतीय संघात कोणते विकेटकीपर्स असतील याबाबत अजूनही शंका आहे. या रेसमध्ये रिषभ पंत, संजू सॅमसन, केएल राहुल आणि दिनेश कार्तिक यांची नावं आघाडीवर आहेत. तसेच रोहित शर्मासोबत कोण सलामीला येईल, याबाबतही सस्पेंस आहे. टीम मॅनेजमेंट शुबमन गिल किंवा यशस्वी जयस्वाल यांच्यापैकी कोणाची निवड करेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच विराट कोहली सलामीला येऊ शकतो, अशी देखील चर्चा सुरु आहे.

टी20 विश्वचषकासाठी ‘महा स्पोर्ट्स’ने निवडलेला भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, रिंकू सिंह, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, शिवम दुबे

महत्त्वाच्या बातम्या – 

एमएस धोनीचा अनोखा विक्रम ! हैद्राबादवर मिळवलेल्या विजयानंतर ‘थाला’च्या नावावर नोंदवला गेलाय एक खास रेकॉर्ड, वाचा

Breaking ! घोषणा झाली… टी20 वर्ल्डकपसाठी न्यूझीलंड संघ जाहीर, केन विलियम्सनकडे नेतृत्वाची धूरा, पाहा संपूर्ण संघ

हैदराबादचे ‘बिग हिटर्स’ सलग दुसऱ्या सामन्यात अपयशी, घरच्या मैदानावर चेन्नईचा 78 धावांनी विजय

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---