आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने टी20 विश्वचषक 2024 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. येत्या 1 जूनपासून सुरू होणाऱ्या टी20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान 9 जूनला न्यूयॉर्कमध्ये आमनेसामने येणार आहेत, मात्र या सामन्यापूर्वी चाहत्यांना एक चिंता सतावत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना ज्या मैदानावर होणार आहे, त्या मैदानाची काही फोटो व्हायरल होत आहेत आणि हे फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल कारण हे स्टेडियम अद्याप बनलेले नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, लॉंग आयलंडमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम जे 9 जून रोजी होणार्या ब्लॉकबस्टर भारत-पाकिस्तान सामन्याचे आयोजन करेल, जे अद्याप तयार नाही. रिपोर्ट्सनुसार, या सामन्यासाठी अत्याधुनिक मॉड्युलर स्टेडियम बनवण्यात येणार आहे, पण हे स्टेडियम 5 महिन्यांत तयार होईल का? हा असा प्रश्न आहे ज्याचे उत्तर प्रत्येक चाहत्याला जाणून घ्यायचे आहे. या स्टेडियमचे सध्याचे काही फोटो समोर आले आहेत. (india vs pakistan t20 world cup 2024 venue pictures stadium is not prepared yet)
Under construction? They haven't even broken ground yet, and won't until February. This is what the Nassau County, NY cricket stadium site for the 2024 T20 World Cup currently looks like. https://t.co/0jiG5rs1GR pic.twitter.com/A8yGh0dT2A
— Peter Della Penna (@PeterDellaPenna) December 31, 2023
1 जून ते 29 जून दरम्यान खेळल्या जाणार्या टी20 विश्वचषक 2024च्या आगामी हंगामात एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. पहिले 16 सामने लॉडरहिल, डॅलस आणि न्यूयॉर्क या तीन शहरांमध्ये आयोजित केले जाणार आहेत. यानंतर, उर्वरित 41 सामने वेस्ट इंडिजमध्ये होतील. गयाना आणि त्रिनिदाद येथे 26 जून आणि 27 जून रोजी उपांत्य फेरीचे सामने आयोजित केले जातील. 29 जून रोजी बार्बाडोस येथे विश्वचषकाचा अंतिम सामना होणार आहे. (Confusion among the fans after seeing the condition of the stadium how will the India-Pak T20 World Cup match be)
टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारताचे वेळापत्रक-
भारत विरुद्ध आयर्लंड – 5 जून, न्यूयॉर्क
भारत विरुद्ध पाकिस्तान – 9 जून, न्यूयॉर्क
भारत विरुद्ध अमेरिका – 12 जून, न्यूयॉर्क
भारत विरुद्ध कॅनडा – 15 जून, फ्लोरिडा
हेही वाचा
‘सगळेच दारू पितात, माझी फक्त बदनामी झाली’, प्रवीण कुमारने माजी क्रिकेटपटूंवर लावले गंभीर आरोप
‘या फॉर्मेटसाठी तो लायक नाही…,’ 12 वर्षांपूर्वी माजी दिग्गजाने विराटबद्दल केलं होतं ट्वीट, आता मात्र वेगळंच काही बोलतोय