---Advertisement---

‘सगळेच दारू पितात, माझी फक्त बदनामी झाली’, प्रवीण कुमारने माजी क्रिकेटपटूंवर लावले गंभीर आरोप

On: मंगळवार, जानेवारी 9, 2024 10:09 AM
Indian-Cricket-Team
---Advertisement---

2000 च्या सुरुवातीचा काळ भारतीय क्रिकेटसाठी एक मनोरंजक काळ होता. हा तो काळ होता जेव्हा भारतातील लहान शहरे, खेड्यापाड्यातील मुले बाहेर पडत होती आणि भारतीय संघामध्ये स्थान मिळवत होती. एमएस धोनी हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. प्रवीण कुमार देखील अशाच पार्श्वभूमीतून आलेला आहे, जो यूपीमधील एका छोट्या ठिकाणाहून आला आणि त्याने भारतीय क्रिकेट संघात स्थान निर्माण केले. आपल्या स्विंग गोलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांना अडचणीत आणणारा प्रवीण स्फोटक फलंदाजीही करायचा. 2007 ते 2012 पर्यंत प्रवीण कुमारने भारतासाठी 6 कसोटी, 68 एकदिवसीय आणि 10 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले.

प्रवीण कुमार (Pravin Kumar) आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, किंग्ज इलेव्हन पंजाब, सनरायझर्स हैदराबाद या संघांसाठीही खेळला होता. एवढी प्रतिभा असूनही त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द फार काळ टिकली नाही. लोक अनेकदा म्हणतात की, प्रवीण कुमार याला खूप एट्यूटूड होता. काही जण म्हणायचे की, त्याला सहज राग येतो. काही रिपोर्ट्समध्ये त्याला मद्यपानाची सवय असल्याचा दावा करण्यात आला होता, मात्र आता प्रवीण कुमारने आपल्याबाबत खळबळजनक खुलासा केला आहे. (praveen kumar accuses senior of defaming him for drinking alcohol)

द ललनटॉपला दिलेल्या मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात प्रवीण कुमार म्हणतो, “मी जेव्हा भारतीय संघात होतो तेव्हा वरिष्ठ खेळाडू म्हणायचे, ‘ड्रिंक करू नको, हे करू नको, असे करू नको. पण प्रत्येकजण ते करत होता, ते माझी बदनामी करतात कारण मी दारू पितो. निवृत्तीनंतर रणजी करंडक स्पर्धेतील यूपी संघानेही मला मुलांच्या गोलंदाजी प्रशिक्षणासाठी बोलावले नाही.”

सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली (Sachin Tendulkar, Rahul Dravid And Sourav Ganguly) यांसारख्या वरिष्ठांनी त्याला दारू न पिण्याचा सल्ला दिला होता का, असे विचारले असता प्रवीणने उत्तर दिले, “नाही, मला कॅमेऱ्यात नावे घ्यायची नाहीत. दारूची बदनामी कोणी केली हे सर्वांना माहीत आहे. सर्वजण त्याला ओळखतात. जे लोक मला वैयक्तिकरित्या ओळखतात त्यांना मी कसा आहे हे माहित आहे. माझी एक वाईट प्रतिमा तयार झाली आहे.” (Everybody drinks alcohol only I got defamed Praveen Kumar makes serious allegations against ex-cricketers)

हेही वाचा

भारतीय संघाच्या अडचणीत वाढ! सुर्यकुमार यादवच्या दुखपतीबाबत मोठी अपडेट समोर
Ball Tampering: भारताच्या दिग्गज गोलंदाजाची कबूली! पुर्वी सगळेच बॅाल कुरतडायचे, ‘पण पाकिस्तानी…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---