टी२० विश्वचषक २०२१ मध्ये रविवारी (२४ ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक दमदार सामना होणार आहे. जेव्हा जेव्हा हे दोन संघ समोरासमोर येतात, तेव्हा तेव्हा केवळ मैदानावरच नव्हे तर मैदानाबाहेरही दोन्ही देशांचे चाहते मोठ्या उत्साहाने आपआपल्या संघाला पाठिंबा देत असतात. जर भारत-पाकिस्तानचा सामना असेल आणि मीम्सची चर्चा होतच असते.
अशा बहू प्रतिक्षित सामन्यादरम्यान नेहमीच एकापेक्षा एक मीम शेअर केले जात असतात. ‘ओ भाई मारो मुझे मारो’चा दु:खी पाकिस्तानी चाहता तुम्हाला आठवत असेल. भारत-पाक सामन्यामुळे पुन्हा ‘मौका-मौका’ सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे आणि यासोबत अनेक मजेदार मीम्सही शेअर केले जात आहेत.
माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफरनेही एक मीम शेअर केली आहे. त्यात, भारतीय चाहते- मला आता दुबईला जायचे आहे. पाकिस्तानचे चाहते- आज संध्याकाळी ६ वाजता माझ्या मृत्यूची गाठ होणार आहे, अशा आशयाचे गमतीदार मीम त्याने पोस्ट केले आहे.
Indian fans and Pakistani fans today ???? #INDvPAK #T20WorldCup pic.twitter.com/NKUqF8OMY4
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) October 24, 2021
एका सोशल मीडिया वापरकर्त्याने भारतीय संघाच्या जर्सी लाँचचा फोटो शेअर केला आणि त्यात लिहिले की, प्रिय पाकिस्तान आशा आहे की फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला संदेश समजला असेल, ‘पहली फुरसत में निकल.’ ह्या प्रचलित संवादाने पाकिस्तानला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
https://twitter.com/suyog_vj/status/1451853055683547136
Everything is temporary, Pakistani fans breaking their TV sets is PERMANENT ????#MaukaMauka ????????#PakVsInd pic.twitter.com/rS5xSCvBw6
— Dr Raunak Baranwal (@rauni214) October 23, 2021
https://twitter.com/ashutosh_sri8/status/1451970795853414403
https://twitter.com/KushalVijay_/status/1451934043784708097
https://twitter.com/varadr_tistic/status/1452165050806923265
Tonight my family situation will be.. #MaukaMauka pic.twitter.com/xNWxwwYsyL
— Abdul Qadir (@AbdulQadir584) October 24, 2021
अजून एका सोशल मीडिया वापरकर्त्याने टॅक्सीतून पडलेल्या व्यक्तीचा फोटो शेअर करत लिहिले, पाकिस्तानी खेळाडू झेल पकडण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचवेळी आंघोळीतून घसरल्यानंतर ‘ओ दादा, मी पडलो.’ ह्या गमतीदार पोस्टने पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षणाकडे बोट दाखवला आहे. अशा अनेक गमतीदार मीम्सचा सोशल मीडियावर अक्षरशः पाऊस पडत आहे
Evil petrol prices be like : pic.twitter.com/zhnMnMEri7
— AnKiT (@FaRzIsHaYaR_) October 23, 2021
विश्वचषक सामन्यात भारतीय संघाचा पाकिस्तानविरुद्ध नेहमीच वरचष्मा राहिला आहे. १९९२ च्या एकदिवसीय विश्वचषकापासून सुरू झालेला विजयाची परंपरा आजही कायम आहे. एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाने आतापर्यंत ७ वेळा पाकिस्तानचा पराभव केला आहे. तर टी२० विश्वचषकात भारताने पाकिस्तानला ५ वेळा हरवले आहे. म्हणजेच एकूणच भारताने विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध १२ वेळा विजय मिळवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बीसीसीआयवर होणार कुबेरकृपा! दोन नव्या फ्रॅंचाईजींकडून मिळू शकतात ‘इतके’ हजार कोटी
‘जर ते जिंकले तर हृदय तुटतील, आपण जिंकलो तर टीव्ही’, इरफानने उडवली पाकिस्तानी चाहत्यांची खिल्ली






