---Advertisement---

भारत पाकिस्तान एजबॅस्टन वर भिडणार, आपण मात्र ‘या’ ठिकाणी सामना पाहणार!

On: रविवार, जुलै 31, 2022 8:54 AM
---Advertisement---

बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे कारण टीम इंडियाला त्यांच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून ३ विकेट्सनी पराभव पत्करावा लागला होता तर पाकिस्तानला बार्बाडोससारख्या कमकुवत संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आता स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा ठरणार आहे.

कधी अन् कुठे होणार सामना?
भारत विरुद्ध पाकिस्तान महिला क्रिकेटचा सामना बर्मिंघम येथील एजबॅस्टन स्टेडियमवर रविवारी (३१ जुलै) खएळला जाईल. या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघ खेळणार असल्याने या सामन्याची उत्कंठा शिगेाला पोहोचली आहे. त्यामुळे हा समना पाहताना रोमांच जाणवेल हे निश्चित.

कधी आणि कुठे पाहावा सामना?
जागतिक क्रिकेटमधील सर्वात उत्सुकतेचा असणारा भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना रविवारी दुपारी ३.३० वाजता सुरू होणार आहे. यंदाच्या वर्षी राष्ट्रकूल स्पर्धेच्या प्रक्षेपणाचे अधिकार सोनी टेलिव्हिजनकडे आहेत. त्यामुळे या सप्र्धेतील इतर सामन्यांप्रमाणेच या सामन्याचे देखील थेट प्रक्षेपण सोनी नेटवर्कवर केले जाईल.

दरम्यान, आगामी काळात राष्ट्रकूल स्पर्धा संपल्यानंतर पुरुषांच्या क्रिकेटमधील स्पर्धा सुरू होती. यामध्ये आशिया चषकामध्ये भारत आणि पाकिस्तान पुरुषांचा संघ आपापसात भिडणार आहे. त्तपूर्वी पाकिस्तान महिला क्रिकेटला पराभूत करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे पाकिस्तानवर असणारे वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया विशेष प्रयत्न करले. शिवाय या स्पर्धेत रपहिल्या सामन्यात लाजीरवाणी हार मिळाल्यानंतर पाकिस्तानी संघ कमबॅक करण्याची संधी शोधत आहे. अशातच हा सामना आता चुरसीचा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

पाकिस्तानचा धुव्वा उडवण्यासाठी टीम इंडिया सज्ज, असा आहे रेकॉर्ड

अर्शदीपने सांगितले आपल्या यशाचे गमक; ‘त्या’ दोन व्यक्तींबाबत बोलला मन जिंकणारी गोष्ट

मोठी बातमी! मिराबाई चानूने घडवला इतिहास, भारताला मिळवून दिले पहिले ‘गोल्ड मेडल’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---