अबुधाबी। 21 सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान संघात एशिया कप 2018 च्या सुपर फोरमधील सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तानने अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकने केलेल्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर 3 विकेट्सने विजय मिळवला.
या विजयानंतर पाकिस्तानचे माजी दिग्गज वेगवान गोलंदाज वासिम अक्रम यांनी मलिकची भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या फिनिशिंग स्टाईलशी तुलना केली आहे.
या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानला विजयासाठी 259 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करत असताना पाकिस्तानला शेवटच्या षटकात 10 धावांची गरज होती. यावेळी आफगाणिस्तानटचा अफताब आलम गोलंदाजी करत होता. तर मलिक फलंदाजीसाठी स्ट्राइकवर होता.
या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मलिकने धाव घेतली नाही. त्यानंतर त्याने दुसऱ्या चेंडूवर षटकार आणि तिसऱ्या चेंडूवर डिप स्केअर लेगला चौकार ठोकत पाकिस्तानला विजय मिळवून दिला.
या विजयानंतर अक्रम यांनी ट्विट केले की, “अनुभवाला पर्याय नाही. शोएब मलिकने आफगाणिस्तान विरुद्ध हे सिद्ध केले आहे. त्याने धोनीप्रमाणे सामना संपवला.”
“जेव्हा मलिक गोलंदाजाला सामोरा गेला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर कसलेही हावभाव नव्हते आणि हिच गोष्ट गोलंदाजांना त्रासदायक होती. त्यामुळे त्याला काय अपेक्षित आहे हेच कळत नव्हते. खूप चांगली खेळी होती.”
मलिकने या सामन्यात 43 चेंडूत 51 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने 3 चौकार आणि 1 षटकार मारले.
पाकिस्तानचा सुपर फोरमधील पुढचा सामना भारताशी रविवारी 23 सप्टेंबरला होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–हिटमॅन रोहित शर्मा या कारणामुळे पाकिस्तान विरुद्ध ठरणार हिट
–टीम इंडियाविरुद्ध हे ३ खेळाडू पाकिस्तानला मिळवून देऊ शकतात एकहाती विजय
–अजिंक्य रहाणेचा वनडेत तडाखा, टीम इंडियाची दारे पुन्हा ठोठावली
–२० वर्षीय राशिद खानचा क्रिकेट जगतातील सर्वात मोठा पराक्रम