आज(18 सप्टेंबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात मोहालीमध्ये दुसरा टी20 सामना होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन या खेळाडूंना विविध विक्रम करण्याची संधी आहे.
आज भारतीय खेळाडू करु शकतात हे विक्रम –
1. या सामन्यात रोहित शर्माने जर 102 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत सुरेश रैनाला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो.
सध्या या यादीत 8475 धावांसह विराट कोहली अव्वल क्रमांकावर, 8392 धावांसह सुरेश रैना दुसऱ्या क्रमांकावर तर 8291 धावांसह रोहित तिसऱ्या क्रमांकावर आहे.
2. या सामन्यात रोहित आणि विराट या दोघांनीही किंवा या दोघांपैकी एकाने जरी 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली तर त्याला आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिकवेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारा फलंदाज होण्याची संधी आहे.
सध्या हा विक्रम या दोघांच्या नावावर संयुक्तरित्या आहे. या दोघांनीही प्रत्येकी 21 वेळा 50 पेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे.
3. शिखरने या सामन्यात 44 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये7000 हजारांचा टप्पा पार करेल. तसेच हा टप्पा पार करणारा एकूण 15 वा खेळाडू तर भारताचा 4 था फलंदाज ठरेल. याआधी भारताच्या विराट कोहली, रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांनी हा टप्पा पार केला आहे.
4. रोहितने जर या सामन्यात 84 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल. सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने टी20 मध्ये 341 धावा केल्या आहेत. तसेच टी20 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक धावा मार्टिन गप्टिलने केल्या आहे. त्याने 424 धावा केल्या आहेत.
5. रोहितने या सामन्यात 4 किंवा त्यापेक्षा अधिक चौकार मारले तर तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक चौकार मारण्याच्या यादीत अफगाणिस्तानच्या मोहम्मद शेहजादला मागे टाकत तिसऱ्या क्रमांकावर येईल.
सध्या या यादीत 231 चौकारांसह विराट अव्वल क्रमांकावर, 223 चौकारांसह तिलत्करने दिल्शान दुसऱ्या क्रमांकावर, 218 चौकारांसह शेहजाद तिसऱ्या आणि 215 चौकारांसह रोहित चौथ्या क्रमांकावर आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–या खास यादीत समावेश होण्यासाठी शिखर धवन केवळ ४४ धावा दूर
–कोहली-स्मिथ कोण आहे सर्वोत्तम फलंदाज? जॉन्टी ऱ्होड्सने घेतले ‘हे’ नाव
–टीम इंडियाकडून २००३च्या विश्वचषकात खेळलेल्या या खेळाडूने घेतली निवृत्ती





