भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला बुधवारी, 3 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. भारतीय संघ कसोटी मालिकेत 0-1ने पिछाडीवर आहे. परंतू दुसऱ्याच सामन्यापुर्वी फिरकीपटू जसप्रीत बुमराहचा एक व्हिडीओ मात्र जोरदार चर्चेत आला आहे. सध्या हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. (Jasprit Bumrah imitates Ravi Ashwin‘s bowling action)
सरावादरम्यान केली अश्विनची नक्कल:
मालिकेतील दुसऱ्या सामन्यापुर्वी टीम इंडिया सराव करत होती. यावेळी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) अश्विनच्या गोलंदाजी ॲक्शनची हुबेहुब नक्कल केली. विशेष म्हणजे भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड देखील बुमराहने अश्विनच्या केलेल्या नक्कलची मजा घेत होता. यावर अश्विनने (Ravichandran Ashwin) मात्र कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही. ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सने एक्सवर (जुने ट्विटर) एक्स करत हा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी वातावरण हलकेफुलके करण्यासाठी बुमराहने ही नक्कल केली. स्टार स्पोर्ट्सने तर अश्विनला ‘ही तुझीच नक्कल आहे का?’ असेही विचारले आहे. (Video Viral) (Jasprit Bumrah Imitates R Ashwin‘s Bowling Action To Perfection In The Nets Ahead Of 2nd Test At Newlands)
Hey Ash, is that you? 🤔@Jaspritbumrah93 could fool anybody with this uncanny imitation of @ashwinravi99 in the #TeamIndia nets! 😂
Name another bowler you’d love to see the pacer mimic. 😉Tune-in to #SAvIND 2nd Test
Tomorrow, 12:30 PM | Star Sports Network#Cricket pic.twitter.com/u6fObA1wan— Star Sports (@StarSportsIndia) January 2, 2024
टीम इंडियासाठी करो या मरोची स्थिती-
भारतीय संघ आजपर्यंत दक्षिण आफ्रिकेत कधीही कसोटी मालिका जिंकलेला नाही. यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाला एक चांगली संधी चालून आली होती. परंतू पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा दारुण पराभव झाला. आता मात्र दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून टीम इंडिया मालिकेत बरोबरी करण्यासाठी प्रयत्न करेल. यामुळे टीम इंडियासमोर सध्यातरी करो या मरो अशीच स्थिती आहे.
केपटाऊनवर आफ्रिकेचेच राज्य
दक्षिण आफ्रिका संघाने टीम इंडियाला केपटाऊनमध्ये कसोटीत कधीही विजय मिळू दिलेला नाही. इथे खेळलेल्या 6 कसोटी सामन्यापैकी 4 कसोटीत टीम इंडियाला पराभव पाहावा लागलेला आहे तर 2 कसोटी अनिर्णित राहिलेल्या आहे. 1993 साली टीम इंडिया इथे पहिला सामना खेळली होती. 2022 साली विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडिया इथे शेवटचा सामना खेळली होती. तेव्हा संघाला 7 विकेट्सने पराभवाला सामोरे जावे लागले होते.
कसोटी मालिका अनिर्णित ठेवणे हेच लक्ष
भारतीय संघ आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकला नाही. 8 कसोटी मालिकांपैकी 7 मालिकेत संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे तर एक मालिका अनिर्णित राहिली आहे. (India vs South Africa)
कर्णधाराचा शेवटचा सामना
या कसोटी सामन्यात आफ्रिकेचे नेतृत्त्व डीन एल्गर करत त्याचा हा शेवटचा सामना आहे. 36 वर्षीय एल्गर आफ्रिकेकडून 85 कसोटी व 8 वनडे सामने खेळला आहे. यात त्याने 5 हजार 300 च्या आसपास धावा केल्या आहेत व 17 विकेट्स घेतल्या आहेत. कर्णधार बवुमा जखमी झाल्यामुळे प्रभारी कर्णधार म्हणून एल्गरला संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे त्याचा हा शेवटचा सामना असल्यामुळे एल्गर तो खास करण्यासाठी सर्व प्रयत्न करेल. (India vs South Africa Bumrah mimics Ashwin in front of Guruji Dravid, appeals to Dravid himself)
लेटेस्ट अपडेट्ससाठी आताचा महा स्पोर्ट्स व्हॉट्सॲप चॅनेल जॉईन करा. इथे क्लिक करा.
महत्त्वाच्या बातम्या इथे वाचा:
IND vs SA: यजमानांनी टाॅस जिंकत घेतला फलंदाजीचा निर्णय, ‘या’ दोन बदलांसह भारत करणार गोलंदाजी
AUS vs PAK: पहिल्या डावात पाकिस्तान संघ 313 धावांवर सर्वबाद, कर्णधार पॅट कमिन्सने घेतलं विकेट्सचं पंचक