---Advertisement---

रोहित शर्मा उंचावणार टी20 विश्वचषकाची ट्राॅफी, शोएब अख्तरनं केलं मोठं वक्तव्य!

On: शुक्रवार, जून 28, 2024 10:54 PM
Shoaib Akhtar
---Advertisement---

यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) फायनल सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. शनिवारी (29 जून) रोजी दोन्ही संघ आमने-सामने असणार आहेत. बार्बाडोसच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. तत्पूर्वी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) म्हणाला की, रोहित शर्मा यंदाचा टी20 विश्वचषक जिंकण्यासाठी पात्र आहे.

शोएब अख्तर (Shoaib Akhtar) त्याच्या अधिकृत यूट्युब चॅनेलवर म्हणाला, “मी नेहमीच भारतानं स्पर्धा जिंकण्याच्या बाजूनं होतो. गेल्या वर्षी जेव्हा भारत विश्वचषक जिंकू शकला नाही तेव्हा मला वाईट वाटलं कारण ते हारण्यासाठी नाही  जिंकण्यासाठी पात्र होते. रोहित शर्मानं वारंवार सांगितलं आहे की त्याला ट्रॉफी जिंकायची आहे आणि म्हणूनच तो विश्चचषक जिंकण्यास पात्र आहे. तो एक मोठा खेळाडू आहे आणि त्याचा शेवट मोठ्या स्तरावर व्हायला हवा. तो निस्वार्थी कर्णधार आहे, संघासाठी खेळतो.”

 

या टी20 विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्मा (Rohit Sharma) भारताचा सर्वोत्तम फलंदाज ठरला आहे. 7 सामन्यांमध्ये, त्यानं 41.33 च्या सरासरीनं आणि 155.97च्या स्ट्राईक रेटनं 248 धावा केल्या आहेत. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतानं गुरुवारी (27 जून) रोजी झालेल्या सेमीफायनल 2 सामन्यात इंग्लंडचा 68 धावांनी पराभव करत फायनलमध्ये धडक मारली.

गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर भारतानं या विश्वचषक स्पर्धेतून इंग्लंडला बाहेर काढलं. रोहितनं सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावून भारताला विजय मिळवून दिला आणि भारत 10 वर्षांनंतर टी20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहोचण्यात यशस्वी ठरला. परंतू फायनल सामन्यासाठी भारताला या विश्वचषकात सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाचं मोठं आव्हान असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कर्णधार बनण्यासाठी रोहित शर्मा इच्छुक नव्हता! सौरव गांगुलीनं केला मोठा खुलासा
IND vs RSA फायनल सामन्यापूर्वी जाणून घ्या कशी आहे बार्बाडोसची खेळपट्टी?
INDW vs RSAW कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतानं ठोकल्या 525 धावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---