---Advertisement---

आता वर्ल्डकप आपलाच…!!! ‘पनौती’ म्हणून ओळख असलेल्या सेलिब्रेटीचा दक्षिण आफ्रिकेला सपोर्ट

On: शनिवार, जून 29, 2024 4:19 PM
---Advertisement---

यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकतील (ICC T20 World Cup) फायनल सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. दोन्ही संघ फायनलसाठी बार्बाडोसच्या मैदानावर आमने-सामने असणार आहेत. तत्पूर्वी प्रसिद्ध व्यवसायिक एमबीए चायवाला (प्रफुल्ल बिल्लोरे) यानं दक्षिण आफ्रिकेला सपोर्ट केला आहे परंतू तुम्हाला वाटत असेल की सपोर्ट केला म्हणून काय झालं? या बातमीद्वारे आपण जाणून घेऊया.

याआधी एमबीए चायवाला अर्थातच प्रफुल्ल बिल्लोरे यानं एका फ्लाईटमध्ये सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सोबत सेल्फी घेतली होती. त्यानंतर सूर्यकुमार यादवची आयसीसी टी20 क्रमवारीत घसरण झाली. नंतर एमबीए चायवाल्यानं सेमीफायनलमध्ये इंग्लंडला सपोर्ट केला आणि इंग्लंड संघ हारला. त्यामुळे सोशल मीडियावर चाहते त्याला ‘पनौती’ म्हणू लागले आहेत. यामुळे आता त्यानं भारत जिंकण्यासाठी फायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेला सपोर्ट  केला आहे.

एमबीए चायवाल्यानं (प्रफुल्ल बिल्लोरे) फायनल सामन्यापूर्वी आफ्रिकेला सपोर्ट करण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भातील अनेक फोटो त्यानं सोशल मीडियावर पोस्ट केलं आहेत. मग काय, पहिल्यांदाच एमबीए चायवाल्यानं आपल्या अधिकारांचा योग्य वापर केला, असे चाहते पोस्टवर कमेंट करत आहेत. यासोबतच आणखी एका यूजरनं लिहिलं की, आता देवच फक्त आफ्रिकेला वाचवू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या-

…तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची फायनल ठरू शकते विराट कोहलीच्या टी20 करिअरची अखेरची मॅच!
“काहीही झालं तरी विजय…” फायनलपूर्वी आफ्रिकेचा कर्णधार मार्करमनं दिला टीम इंडियाला इशारा
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार टी20 विश्वचषकाची फायनल, दीड महिन्यापूर्वीच झाली होती भविष्यवाणी! 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---