भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात नुकतीच 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेत न्यूझीलंडने भारताचा 3-0 ने धुव्वा उडवला. आता भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असणार आहे. तिथे भारतीय संघ 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. दोन्ही संघातील या टी20 मालिकेला (8 नोव्हेंबर) पासून सुरूवात होणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ एडन मार्करमच्या (Aiden Markram) नेतृत्वाखाली, तर भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे.
दोन्ही संघातील हेड टू हेड रेकाॅर्डबद्दल बोलायचे झाले, तर भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) टी20 मध्ये 27 वेळा आमने-सामने आले आहेत. त्यामध्ये भारताचे वर्चस्व राहिले आहे. 27 सामन्यांपैकी भारताने 15 तर दक्षिण आफ्रिकेने 11 वेळा विजय मिळवला आहे आणि 1 सामना अनिर्णित राहिला.
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील टी20 सामने स्पोर्ट्स 18 नेटवर्कच्या टीव्ही चॅनेलवर प्रसारित केले जाणार आहेत. या टी20 मालिकेच्या डिजिटल स्ट्रीमिंगचे अधिकार जिओ सिनेमाच्या ॲप आणि वेबसाइटकडे आहेत. चाहते जिओ सिनेमाच्या (Jio Cinema) ॲप आणि वेबसाइटवर सामना फ्री मध्ये पाहू शकतात.
भारत-दक्षिण आफ्रिका टी20 मालिकेचे पूर्ण वेळापत्रक-
पहिला टी20 सामना, 08 नोव्हेंबर, किंग्समीड (डर्बन)
दुसरा टी20 10 नोव्हेंबर, सेंट जॉर्ज पार्क (गेकेबेहारा)
तिसरा टी20 सामना, 13 नोव्हेंबर, सुपर स्पोर्ट्स पार्क (सेंच्युरियन)
चौथा टी20 सामना, 15 नोव्हेंबर, वांडरर्स स्टेडियम (जोहान्सबर्ग)
3 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी दोन्ही संघ-
भारत- सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंह, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रमनदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजय कुमार वैशाख, आवेश खान, यश दयाल
दक्षिण आफ्रिका- एडन मार्करम (कर्णधार), ओटेनिल बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली मपोंगवाना, नकाबा पीटर, रायन रिकेल्टन, एंडिले सिमेलेन, लुई सिमेला, ट्रिस्टन स्टब्स
महत्त्वाच्या बातम्या-
AUS vs PAK; बाबर आझमचे संघात पुनरागमन, पाकिस्तानचा ऑस्ट्रलियाकडून पराभव
जय शाहनंतर कोण होणार बीसीसीआय सचिव? ही नावे शर्यतीत
ब्रायन लाराच्या आधी ‘या’ फलंदाजाने ठोकल्या असत्या कसोटीत 400 धावा