दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना गमावल्यानंतर भारतीय संघ शुक्रवारी (२१ जानेवारी) दुसरा सामना जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरला होता. पण दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीर जानेमन मलालने क्विंटन डिकॉकसोबत १३२ धावांची भागीदारी करत भारताला विजय मिळणार नाही, याची काळजी घेतली. दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या सामन्यात भारतावर ७ गडी राखून विजय मिळवत मालिकेत २-० ने आघाडी घेतली. आता या पराभवानंतर कर्णधार केएल राहुलने प्रतिक्रिया दिली आहे.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून मलानने ९१, तर क्विंटन डिकॉक ७८ धावा केल्या. क्विंटन डिकॉकला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. मलानने टेंबा बावुमासोबत ८० धावांची भागीदारी केली. भारताकडून रिषभ पंतने सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने ८५ धावा (७१ चेंडू) धावा केल्या आणि भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद २८७ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने ११ चेंडू राखून आणि तीन विकेट्स गमावत भारतावर विजय मिळवला.
रोहित शर्माच्या दुखापतीमुळे या एकदिवसीय मालिकेत भारताचे कर्णधारपद केएल राहुल सांभाळत आहे. दरम्यान, राहुलवर कर्णधारपदाचे दडपण दिसून आले. कारण तो पहिल्या आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात खास कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. त्याने घेतलेले काही निर्णय देखील आश्चर्यचकीत करणारे राहिले. तसेच याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत जोहान्सबर्ग येथे विराट कोहलीच्या दुखापतीमुळे केएल राहुलने भारताची कमान सांभाळली होती. तो सामनासुद्धा भारताने गमावला होता.
एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर केएल राहुल म्हणाला की, “मला वाटते की, दक्षिण आफ्रिका संघ घरच्या मैदानावर खूप चांगले क्रिकेट खेळत आहेत. आपण सामन्याच्या मधेच चुका करत आहोत. हा आमच्यासाठी चांगला धडा आहे. आम्ही एक असा संघ आहोत, ज्याला जिंकण्याचा खूप अभिमान वाटतो. आम्ही ज्या गोष्टींमुळे भुतकाळात चांगली कामगीरी करु शकलो नाही, त्या सुधरवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.”
पुढे राहुल म्हणाला की, “मध्यक्रमात भागीदारी महत्वाची असते. तसेच मधल्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागते. मला वाटत नाही की, ही एक अशी खेळपट्टी होती, जिथे त्यांनी इतक्या सहजपणे २८० धावांचा पाठलाग केला असता. याचे श्रेय आफ्रिकन संघाला द्यावे लागेल. पहिल्या सामन्यात शिखर आणि विराटने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, ती शानदार होती. आता आपण अंतिम सामना जिंकण्याचा प्रयत्न करू.”
व्हिडिओ पाहा – सचिन-कांबळीच्या करामतीने गांगुलीच्या रुममध्ये झालेलं पाणीच पाणी
तसेच केएल राहूलने रिषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि शार्दुल ठाकूरचे कौतुक केले आहे. भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना २३ जानेवारीला केपटाउन येथे पार पडणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
धोनीनंतर ‘हा’ फलंदाज निभावू शकतो सर्वोत्तम फिनिशरची भूमिका, सुनील गावसकरांनी सुचवला पर्याय
भारताला धक्का! १९ वर्षाखालील विश्वचषकाच्या अखेरच्या साखळी सामन्यातून कर्णधारासह ‘हे’ ५ खेळाडू बाहेर
कर्णधार बदलला पण रिझल्ट तोच! बाह्यदेशात वनडे मालिकेत सपाटून मार खाण्याची परंपरा कायम, पाहा यादी