नुकताच जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (SA vs IND) संघांमध्ये दुसरा कसोटी सामना पार पडला आहे. या सामन्यात यजमानांनी ७ विकेट्स राखून विजय मिळवत ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. भारताच्या कसोटी संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली हा दुखापतग्रस्त असल्याने त्याच्याजागी केएल राहुल (Captain KL Rahul) याला संधी दिली गेली होती. परंतु कर्णधाराच्या रूपात त्याला आपल्या पहिल्याच सामन्यात (Captain KL Rahul Fail) पराभवाचा सामना करावा लागला आहे.
या सामन्यादरम्यान कर्णधार म्हणून राहुलकडून काही निर्णय घेण्यात चूका (Mistakes Of KL Rahul In Captaincy) झाल्या आहेत. त्याच चूकांबद्दल आपण येथे सविस्तर जाणून घेणार आहोत.
जोहान्सबर्गमध्ये राहुलकडून झाल्या या चूका
पहिली चूक
जोहान्सबर्ग कसोटीच्या चौथ्या दिवशी पावसामुळे मोठ्या ब्रेकनंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ मैदानावर फलंदाजीसाठी उतरला होता, त्यावेळी भारताच्या वेगवान गोलंदाजांकडून विकेट्सची अपेक्षा होती. दक्षिण आफ्रिकेचा संघ २ बाद ११८ धावा अशा स्थितीत होता. परंतु राहुलने फिरकीपटू आर अश्विनच्या हाती डावातील दुसरेच षटक सोपवले होते. मात्र त्या दिवशी त्याने फक्त २ षटके गोलंदाजी केली.
पावसामुळे जोहान्सबर्गच्या खेळपट्टीपासून वेगवान गोलंदाजांना मदत मिळत होती. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवरून ही गोष्ट स्पष्टपणे जाणवत होती. परंतु बुमराहव्यतिरिक्त दुसऱ्या बाजूनेही चांगली वेगवान गोलंदाजी झाली असती, तर दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण झाला असता. परंतु अश्विनच्या २ षटकांमध्ये त्यांना मैदानावर सेट होण्यास माफक वेळ मिळाला.
दुसरी चूक
पहिल्या डावात ७ विकेट्स घेत अनेक विक्रमांचा रतीब घालणाऱ्या वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला सामन्याच्या चौथ्या दिवशी मात्र फार कमी गोलंदाजीची संधी मिळाली. चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर सुरुवातीची १० षटके सरल्यानंतर कर्णधार राहुलने शार्दुलला गोलंदाजीसाठी बोलावले होते. खरे तर या सामन्यात शार्दुल चांगल्या फॉर्ममध्ये होता आणि त्याने दुसऱ्या डावातही १ विकेट घेतली होती. परंतु कर्णधार राहुल त्याचा योग्यपद्धतीने वापर करून घेऊ शकला नाही.
आयपीएलमध्येही केले आहे निराश (Fail In IPL)
राहुलला भारतीय संघाचा भावी कर्णधार म्हणून पाहिले जात आहे. परंतु व्यावसायिक क्रिकेटमध्ये तो आपले नेतृत्त्व कौशल्य दाखवण्यात अपयशी ठरताना दिसतो आहे. जोहान्सबर्ग कसोटीपूर्वी त्याने इंडियन प्रीमियर लीग (IPL) अर्थातच आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज संघाचे नेतृत्त्व केले आहे. सलग २ वर्षे तो पंजाबचा संघनायक होता, परंतु त्याच्या नेतृत्त्वाखाली दोन्ही हंगामातही संघाला चांगली कामगिरी करता आली नाही.
आयपीएल २०२० मध्ये राहुलनने फलंदाज म्हणून चांगली कामगिरी करत ऑरेंज कॅप पटकावली होती. परंतु कर्णधार म्हणून तो फेल झाला आहे. त्याने या हंगामात १४ सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्त्व करताना फक्त ६ सामने जिंकले होते आणि ८ सामन्यात संघाल पराभवाचा सामना करावा लागला होता. यासह संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर राहिला होता. तसेच आयपीएल २०२१ मध्येही त्याने नेतृत्त्वात निराशा केली होती. या हंगामातही पंजाबचा संघ सहाव्या स्थानीच राहिला होता. त्यांनी या हंगामातील १४ पैकी ६ सामने जिंकले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
कॅरेबियन क्रिकेटला सोन्याचे दिवस आणण्यासाठी बोर्डाने कसली कंबर! दिग्गजाकडे दिली मोठी जबाबदारी
राहुल द्रविड घेणार रिषभ पंतची शिकवणी? वाचा काय म्हणाले मुख्य प्रशिक्षक
हेही पाहा-