INDvsSA Test: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला येत्या मंगळवारपासून (दि. 26 डिसेंबर) सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कमध्ये खेळला जाईल. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी सामना जिंकला नाहीये. रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची नजर हा इतिहास घडवण्यावर आहे. मात्र, या सामन्यात पावसाचा अडथळा निर्माण होऊ शकतो. पहिल्या कसोटीदरम्यान हवामान खराब असण्याचा अंदाज आहे. याचीही शक्यता आहे की, सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे रद्द होऊ शकतो.
सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरियन (SuperSport Park, Centurion) ब्रायन ब्लॉय यांनी म्हटले की, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघातील पहिल्या कसोटीवर पावसाचा धोका आहे. या पार्कमधील खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर राहण्याची आशा आहे, ज्यामुळे फलंदाजांना काही आव्हानांचा सामना करावा लागेल. त्यांनी असेही म्हटले की, कसोटीच्या सुरुवातीच्या आणि दुसऱ्या दिवशी खेळाची शक्यता खूपच कमी आहे. जोरदार पावसामुळे तापमानात घसरण होईल, ज्यामुळे फिरकीपटूंना फायदा होणार नाही.
तापमानात होऊ शकते घसरण
ब्लॉय म्हणाले की, “तापमान खूपच कमी असेल, जसे की 20 अंश सेल्सियस. आता तापमान 34 अंश सेल्सियस आहे आणि यात घसरण होऊन 20 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचेल. मला माहिती नाही की, परिस्थिती कशी असेल की, आम्हाला पहिला दिवस खेळायला मिळेल की नाही. आशा करतो की, खेळ व्हावा. तसेच, तिसऱ्या दिवशीही इथे सर्व ठीक राहील, पण मला वाटत नाही की, खेळपट्टी किती वळेल.”
पहिल्या दिवशी पावसाची 96 टक्के शक्यता
माध्यमांतील वृत्तांनुसार, कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसाची शक्यता 96 टक्के आहे. हा दिवस-रात्र कसोटी नाहीये. अशात खेळ दिवसाच होईल. सेंच्युरियनमध्ये 26 डिसेंबर रोजी जोरदार पाऊस पडेल, असे बोलले जात आहे. आभाळात ढग दाटण्याची शक्यता 94 टक्के आहे. कमीत कमी चार तास पावसाची शक्यता आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हेड टू हेड आकडेवारी
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात आतापर्यंत 42 कसोटी सामने खेळले गेले आहेत. भारतीय संघाने त्यापैकी 15 जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेने 17 सामन्यात विजय मिळवला आहे. 10 सामने अनिर्णित राहिले आहेत. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेतील भारताची आकडेवारी पाहिली, तर आतापर्यंत 23 सामने खेळले गेले आहेत. भारताला फक्त 4 सामन्यात विजय मिळवता आला आहे. तसेच, 12 सामने यजमान संघाने जिंकले असून 7 सामने अनिर्णित राहिले आहेत. (india vs south africa weather pitch and forecast about supersport park centurion 1st test)
हेही वाचा-
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन महिला 261वर All Out, भारतीय रणरागिणी इतिहास घडवण्यापासून ‘एवढ्या’ धावा दूर
INDvsSA पहिल्या कसोटीसाठी गावसकरांनी निवडली जबरदस्त Playing XI, ‘या’ स्टार खेळाडूंना मिळाली जागा