---Advertisement---

भारत बनणार विश्वविजेता! इंग्लंडच्या माजी कर्णधाराने केली भविष्यवाणी

On: शनिवार, जून 29, 2024 8:00 PM
---Advertisement---

इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू मायकेल वॉन त्याच्या सततच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. आता त्याने बार्बाडोस येथे होणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्याची भविष्यवाणी केली आहे. ‘X’ वर पोस्ट करताना मायकेलने भारतीय संघाचे पारडे दक्षिण आफ्रिकेवर जड जाईल अशी आशा व्यक्त केली आहे. विराट कोहली अर्धशतक झळकावेल असा अंदाजही त्याने वर्तवला आहे. विराटला या स्पर्धेतील 7 सामन्यात केवळ 75 धावा करता आल्या.

भारत विश्वविजेता होण्याचा अंदाज व्यक्त करणाऱ्या मायकेल वॉनने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मला विश्वास आहे की टीम इंडिया बार्बाडोसमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करेल. या सामन्यात विराट कोहली अर्धशतक ठोकेल आणि भारत चॅम्पियन होईल, हे माझे भाकीत आहे. .” मायकेल वॉन हा तोच व्यक्ती आहे ज्याने काही दिवसांपूर्वी आयसीसीवर आरोप केला होता की भारताला त्यांच्या सोयीनुसार वेळापत्रक देण्यात आले आहे. त्याने भारतीय प्रेक्षकांवरही निशाणा साधला आहे.

याच्या काही तासांपूर्वी मायकेल वॉनने आणखी एक पोस्ट केली होती, ज्यामध्ये त्याने दावा केला होता की, जर भारताने टी20 विश्वचषक  2024 जिंकला तर टीम इंडिया सलग अनेक आयसीसी ट्रॉफी जिंकू शकते. त्याच्या मते भारताच्या संघात गुणवत्ता आहे. भारताला कोणतीही आयसीसी ट्रॉफी जिंकून 10 वर्षे झाली आहेत आणि 2024 मधील विजयानंतर त्यांची ट्रॉफी जिंकण्याचा सिलसिला सुरू होऊ शकतो.

महत्तवाच्या बातम्या-

फायनल सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूनं! जाणून घ्या दोन्ही संघाच्या प्लेइंग 11
फायनल जिंकताच रोहित शर्मा रचेल इतिहास, अशी कामगिरी करणारा बनेल जगातील पहिला कर्णधार
रोहित-रबाडापासून, विराट-यानसेनपर्यंत, फायनलमध्ये या खेळाडूंमध्ये पहायला मिळेल जंगी लढत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---