लखनऊ। भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात गुरुवारपासून (२४ फेब्रुवारी) ३ सामन्यांच्या टी२० मालिकेला (T20I Series) सुरुवात झाली. या मालिकेतील पहिला सामना (1st T20I) लखनऊच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
या सामन्यासाठी भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघात एकूण ६ बदल करण्यात आले. भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघात संजू सॅमसन, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल या ५ खेळाडूंचे पुनरागमन झाले. त्याचबरोबर दीपक हुडाने आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले आहे. तो आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण करणारा भारताचा ९७ वा खेळाडू ठरला आहे. तसेच कर्णधार रोहित शर्माने दिलेल्या माहितीनुसार या संघात ऋतुराज गायकवाडलाही संधी दिली जाणार होती. मात्र, त्याच्या मनगटाला दुखापत झाली आहे.
तसेच श्रीलंकेनेही अंतिम ११ जणांच्या संघात बदल केले आहेत. त्यांनी दिनेश चंडीमल आणि जेफ्री वेंडरसे यांना दुखापतग्रस्त तिक्षणा आणि कुसल मेंडिस यांच्या जागेवर संधी देण्यात आली आहे.
आमने-सामने कामगिरी
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये गुरुवारच्या सामन्यापूर्वी भारत आणि श्रीलंका संघात २२ सामने झाले होते. त्यातील १४ सामन्यात भारताने विजय मिळवला होता. तसेच ७ सामने श्रीलंकेने जिंकले होते, तर एका सामन्याचा निकाल लागलेला नाही.
असे आहेत ११ जणांचे संघ
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, दीपक हुडा, रवींद्र जडेजा, वेंकटेश अय्यर, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल.
श्रीलंका – पाथम निसंका, कामिल मिश्रा, चरित असलंका, दिनेश चंडीमल(यष्टीरक्षक), जेनिथ लियानागे, दासुन शनका(कर्णधार), चमिका करुणारत्ने, जेफ्री वेंडरसे, प्रवीण जयविक्रमा, दुष्मंथा चमीरा, लाहिरू कुमारा
महत्त्वाच्या बातम्या –
शेन वॉर्नसाठी सचिन नाहीये ‘गॉड ऑफ क्रिकेट’, पाहा कोणाचं घेतलंय नाव
केवळ तिलकरत्ने दिल्शानला जमलेला तसा विक्रम न्यूझीलंडच्या एमीलिया केरने केलाय, तोही भारताविरुद्ध
टी२०मध्ये ७००० धावा अन् २०० विकेट्स! पाकिस्तानी क्रिकेटपटूची छोट्या क्रिकेट प्रकारात मोठी कामगिरी






