भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तीन टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका संघाची आज घोषणा करण्यात आली आहे. अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगा आणि वेगवान गोलंदाज सुरंगा लकमल यांना संघात वेगवेगळ्या कारणामुळे संधी देण्यात आली नाही.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने जे प्रसिद्धी पत्रक दिले आहेत त्यात मलिंगाला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे तर रोटेशन पॉलिसीनुसार सुरंगा लकमलला संघात स्थान देण्यात आले नाही. विश्वा फर्नांडोला अजून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आजपर्यंत संधी मिळाली नव्हती परंतु या मालिकेत त्याला संधी देण्यात आली आहे.
श्रीलंका संघ: थिसारा परेरा (कर्णधार), उपुल थरांगा, अँजेलो मॅथ्यूज, कुशल जनिथ परेरा, दनुष्का गुणातिल्का, निरोशन डिकवेलला, असेला गुणरत्ने, सदिरा समरविक्रमा, दसून शनका, चतुरंगा दे सिल्वा, सचिंत पाठीराना, अकिला धनंजया, दुश्मनथा चामीरा, नुवान प्रदीपा, नुवान प्रदीप, विश्वा फर्नांडो