---Advertisement---

IND vs SL निर्णायक सामन्यात श्रीलंकेचं भारतासमोर 241 धावांचं आव्हान

On: रविवार, ऑगस्ट 4, 2024 6:18 PM
---Advertisement---

भारताचा सध्या श्रीलंका दौरा आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिला एकदिवसीय सामना कोलंबो मैदानावर खेळला गेला. या सामन्यात दोन्ही संघामध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. शेवटी हा सामना बरोबरीत सुटला. आता दुसरा एकदिवसीय सामना चालू आहे. त्यामध्ये श्रीलंकेनं टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. श्रीलंकेनं भारतासमोर 241 धावांचं आव्हान ठेवलं आहे.

श्रीलंकेसाठी प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर अविष्का फर्नांडोनं (Avishka Fernando) 62 चेंडूत (40) धावांची खेळी खेळली. 40 धावांच्या खेळीत त्यानं 5 चौकार लगावले. तर कामिंदू मेंडिसनं देखील (40) धावा केल्या. यष्टीरक्षक कुसल मेंडिसनं (30) धावांची खेळी खेळली. त्याच्या खेळीत त्यानं 3 चौकार लगावले. दुनिथ वेल्लालागेनं (39) धावांची खेळी खेळली. त्यामध्ये त्यानं 2 षटकारांहस 1 चौकार लगावला. कर्णधार चरिथ असलंकानं (25) धावांची खेळी केली. त्यावर श्रीलंकेनं 9 गडी गमावून 240 धावा केल्या.

भारतासाठी गोलंदाजी करताना फिरकीपटू वाॅशिंग्टन सुंदरनं सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर दिग्गज फिरकीपटू कुलदीप यादवनं (Kuldip Yadav) 2 विकेट्स घेतल्या. अष्टपैलू अक्षर पटेल (Axar Patel) आणि मोहम्मद सिराजनं (Mohammed Siraj) 1-1 विकेट मिळवली.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी दोन्ही संघ

भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज

श्रीलंका- चरिथ असालंका (कर्णधार) पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सदीरा समरविक्रमा, कामिंदू मेंडिस, जेनिथ लियानागे, दुनिथ वेललागे, अकिला धनाजया, असिथा फर्नांडो, जेफ्री वेंडरसे

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs SL पहिल्या चेंडूवर विकेट घेवून मोहम्मह सिराजनं रचला इतिहास..!
पॅरिस ऑलिम्पिक 2024 : पदकाचं स्वप्न भंगलं, बाॅक्सर लोव्हलिनाचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव
रेड कार्ड, मैदानावर 10 खेळाडू; तरीही हार मानली नाही! ‘ग्रेट वॉल’ श्रीजेशचा पेनॉल्टी शूटआऊटमध्ये पराक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---