धरमशाला। भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात शनिवारी हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (HPCA Stadium) टी२० मालिकेतील दुसरा सामना (2nd T20I) झाला. हा सामना भारताने ७ विकेट्सने जिंकला. याबरोबरच भारतीय संघाने ३ सामन्यांच्या टी२० मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारताने या सामन्यात विजय मिळवलेला असला, तरी श्रीलंकेच्या बिनुरा फर्नांडोने (Binura Fernando) त्याच्या क्षेत्ररक्षणाने सर्वांचीच मने जिंकली आहेत.
बिनुराने घेतला अफलातून झेल
या सामन्यात श्रीलंकेने भारताला १८४ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने इशान किशन आणि रोहित शर्मा यांच्या विकेट्स लवकर गमावल्या होत्या. पण त्यानंतर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि संजू सॅमसन (Sanju Samson) यांनी भारताचा डाव सावरला. या दोघांनी भागीदारी चांगली रंगली होती. मात्र , लहिरू कुमारा गोलंदाजी करत असलेल्या डावाच्या १३ व्या षटकातच्या अखेरच्या चेंडूवर सॅमसनचा बिनुराने अफलातून झेल घेतला आणि त्यांची भागीदारी तोडली.
झाले असे की, सॅमसनने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. पण, चेंडूने त्याच्या बॅटची कड घेतली आणि मागे गेला. यावेळी डीप स्लीपमध्ये ६ फुट ६ इंच उंची असलेला बिनुरा क्षेत्ररक्षण करत होता. त्यानेही चपळता दाखवत मागे हवेत उडी घेत एका हाताने झेल पकडला. त्याचा हा झेल पाहून सॅमसनसहीत मैदानावरील सर्वचजण चकीत झाले. त्याच्या या झेलचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.
Binura Fernando ????????
WHAT A CATCH….????#INDvSL pic.twitter.com/5ymg7mzYle— Sandalu Gaganaka ????????✨ (@gaganaka49) February 26, 2022
या सामन्यात सॅमसनने २५ चेंडूत ३९ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने २ चौकार आणि ३ षटकार मारले. त्याच्याशिवाय भारताकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक ७४ धावांची खेळी केली, तर रविंद्र जडेजाने ४५ धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने १८४ धावांचे आव्हान १७.१ षटकात पूर्ण केले.
https://twitter.com/ADNANKH85410496/status/1497615012495380482
भारताची मालिकेत विजयी आघाडी
भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धचा दुसरा टी२० सामना जिंकला असल्याने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. यापूर्वी भारताने लखनऊ येथे झालेला पहिला टी२० सामना ६२ धावांनी जिंकला होता. आता तिसरा टी२० सामना धरमशाला येथेच रविवारी (२७ फेब्रुवारी) होणार आहे. हा सामना जिंकून भारताला श्रीलंकेला व्हाईटवॉश देण्याची संधी असणार आहे, तर श्रीलंका प्रतिष्ठा राखण्याच्या हेतूने या सामन्यात खेळण्यासाठी उतरेल.
महत्त्वाच्या बातम्या :
मायदेशात विजय मिळवण्यात कर्णधार रोहित ‘नंबर वन’! ‘इतक्या’ विजयांसह मॉर्गन-विलियम्सनला टाकले मागे





