---Advertisement---

IND vs SL; पहिल्याच सामन्यात सूर्या चमकला, ठोकले झंझावाती अर्धशतक

On: शनिवार, जुलै 27, 2024 8:30 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यामध्ये 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला टी20 सामना खेळला जात आहे. या सामन्यात श्रीलंका कर्णधार चरिथ असलंकानं (Charith Asalanka) टाॅस जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. प्रत्युत्तरात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवनं झंझावाती अर्धशतकी खेळी केली.

भारताकडून सलामीवीर यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि शुबमन गिल (Shubman Gill) यांनी धमाकेदार सुरुवात केली. दोघांनी अनुक्रमे 40 आणि 34 धावांची खेळी खेळली. त्यानंतर दोघंही लागोपाठ बाद झाले. तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय कर्णधारानं धमाकेदार खेळी खेळून भारतीय संघाचा डाव सावरला. सूर्यकुमार यादवनं 26 चेंडूत 58 धावांची खेळी खेळली.

सूर्यानं त्याच्या खेळीमध्ये 2 षटकार आणि 8 चौकार लगावले. यादरम्यानं त्याचा स्ट्राईक रेट 223.08 राहिला. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथीशा पाथिरानाच्या चेंडूवर तो एलबीडब्ल्यू बाद होऊन तंबूत परतला.

पहिल्या टी20 सामन्यासाठी दोन्ही संघांच्या प्लेइंग 11

भारत- शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), रियान पराग, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज

श्रीलंका- पाथुम निसांका, कुसल मेंडिस(यष्टीरक्षक), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चरित असलंका(कर्णधार), वानिंदू हसरंगा, दासुन शनाका, महेश तीक्ष्णा, मथीशा पाथिराना, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका

महत्त्वाच्या बातम्या-

पॅरिस ऑलिम्पिक : टेबल टेनिसमध्ये भारताचा दबदबा, बॅडमिंटनमध्येही शानदार कामगिरी
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये डोपिंगचे पहिले प्रकरण समोर, इराकच्या जुडोपटूचे स्वप्न भंगणार
पंतमुळे संजू सॅमसन पुन्हा दुर्लक्षित! टीम इंडियाचा प्रमुख यष्टीरक्षक बनण्यासाठी घ्यावी लागणार आणखी मेहनत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---