भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये 3 सामन्यांची टी20 मालिका पार पडली. या मालिकेत भारतानं श्रीलंकेचा 3-0 असा धुव्वा उडवला. शेवटच्या टी20 सामन्यात सुपर ओव्हरचा रोमांच पाहायला मिळाला. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली भारतानं चमकदार कामगिरी केली. परंतू शुक्रवारी (2 ऑगस्ट) पुन्हा एकदा दोन्ही संघ आमने-सामने असणार आहेत. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे.
3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची धुरा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हाती आहे. श्रीलंका संघ चारिथ असलंकाच्या (Charith Asalanka) नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. कोलंबोच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. तत्पूर्वी दोन्ही संघांचे एकदिवसीय क्रिकेटमधील हेड टू हेड रेकाॅर्ड या बातमीद्वारे आपण जाणून घेऊया.
भारत आणि श्रीलंका एकदिवसीय क्रिकेटमध्ये 168 वेळा आमने-सामने आले आहेत. त्यामध्ये भारतानं 99 सामने जिंकले आहेत तर 57 सामन्यांमध्ये भारताचा पराभव झाला आहे. श्रीलंकेनं 168 सामन्यांपैकी 57 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर 99 सामन्यांमध्ये त्याना पराभवाचा सामना करावा लागला आहे. दोन्ही संघांमध्ये 11 सामने अनिर्णित राहिले आहेत. तर एक सामना टाय झाला आहे.
3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी दोन्ही संघ
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), रिषभ पंत (यष्टिरक्षक), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, खलील अहमद, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, रियान पराग, हर्षित राणा
श्रीलंका- चारिथ असलंका (कर्णधार), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, सदीरा समरविक्रमा, जेनिथ लियानागे, डुनिथ वेललागे, वानिंदू हसरंगा, महेश तीक्ष्णा, असिथा फर्नांडो, मोहम्मद शिराज, चमिका करुणारत्ने, अकिला धनाजया, कमिंदू मेंडिस, निशान मधुशंका, इशान मलिंगा
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल 2025च्या मेगा लिलावात सीएसके धोनीला रिटेन करणार?
जगातला कोणताच फलंदाज मोडू शकणार नाही, सचिन तेंडुलकरचे हे 5 वर्ल्ड रेकाॅर्ड
ऑलिम्पिक पदक जिंकताच स्वप्नील कुसाळेचं प्रोमोशन, मध्य रेल्वेत आता ऑफिसर म्हणून काम करणार!