IND vs SL, 2nd T20 Match:- भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्य़ा टी20 सामन्याच्या नाणेफेकीला पावसामुळे उशीर झाला असून भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी सव्वा सात वाजता नाणेफेक झाली. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सामन्याची सुरुवात 7.45 मिनिटांनी होणार आहे.
दुसऱ्या टी20 सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. सलामीवीर व उपकर्णधार शुबमन गिल याच्याऐवजी संजू सॅमसन याला अंतिम 11 मध्ये स्थान देण्यात आले आहे. स्नायूंमध्ये ताण आल्याने शुबमनला विश्रांती देण्यात आली आहे. तसेच श्रीलंका संघातही एक बदल करण्यात आला आहे. दिलशान मधुशंकाला बाहेर बसवत रमेश मेंडिसला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली गेली आहे.
Update:
Rain has stopped
Toss at 7.15 PM IST
Start of Play: 07.45 PM IST#TeamIndia | #SLvIND https://t.co/vA3xO4mJBS
— BCCI (@BCCI) July 28, 2024
भारताची प्लेइंग इलेव्हन: यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रियान पराग, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज
श्रीलंकेची प्लेइंग इलेव्हन: पथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चरिथ असलंका (कर्णधार), दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, रमेश मेंडिस, महेश थेक्षाना, मथीशा पाथिराना, असिथा फर्नांडो
हेही वाचा –
भाड्यानं पिस्तूल घेऊन राष्ट्रीय स्पर्धा खेळली… वीरेंद्र सेहवागकडून घेतले होते क्रिकेटचे धडे; आश्चर्यकारक आहे मनू भाकरची कहाणी
शाब्बास मनू! पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं जिंकलं पहिलं मेडल; नेमबाजीत कांस्य पदकावर निशाणा
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकाची आशा वाढली! रमिता जिंदाल फायनलमध्ये दाखल