---Advertisement---

हारना मना है! भारताची श्रीलंकाविरुद्ध ‘करा वा मरा’ लढत; कधी, कुठे होणार सामना? वाचा एका क्लिकवर

On: मंगळवार, सप्टेंबर 6, 2022 9:18 AM
Rohit-Sharma-Dasun-Shanaka
---Advertisement---

आशिया चषक 2022 चा (Asia Cup 2022) हंगाम अंतिम चरणात आहे. साखळी फेरीतील सामने संपल्यानंतर आता आशिया चषकातील सुपर-4 सामने सुरू आहेत. यातील तिसरा सामना मंगळवारी (06 सप्टेंबर) भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात रंगणार आहे. भारतीय संघासाठी हा ‘करा अथवा मरा’ सामना असणार आहे. कारण भारताने सुपर-4 फेरीतील त्यांचा पहिला पाकिस्तानविरुद्धचा सामना गमावला आहे. त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारतीय संघाला कोणत्याही परिस्थितीत श्रीलंकेला पराभूत करावे लागणार आहे.

सध्या आशिया चषकातील गुणतालिकेत विजयासह पाकिस्तान आणि श्रीलंका संघ टॉपला आहेत. तर पराभवामुळे भारत आणि अफगाणिस्तान संघ तिसऱ्या व चौथ्या स्थानावर आहेत.

श्रीलंका विरुद्ध भारत तिसऱ्या सुपर-4 सामन्याबद्दल सविस्तर माहिती
सामना: श्रीलंका विरुद्ध भारत
तारीख आणि वेळ: मंगळवार 06 सप्टेंबर, संध्याकाळी ७.३० वाजता
स्थळ: दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स / डीडी स्पोर्ट्सवर भारतात लाईव्ह सामना पाहता येईल. डिझ्नी हॉटस्टारद्वारे मोबाईलवर लाइव्ह स्ट्रिमिंग होईल

श्रीलंका आणि भारतचे संपूर्ण संघ-
श्रीलंका संघ: दासुन शनाका (कर्णधार), धनुष्का गुणतिलका, पाथुम निसांका, कुसल मेंडिस, चरिथ असलांका, भानुका राजपक्षे, अशेन बंडारा, धनंजय डिसिल्वा, वानिंदु हसरंगा, महीष तीक्षणा, जैफ्री वांडेरसे, प्रवीण जयविक्रमा, चमिका करुणारत्ने, दिलशान मदुशंका, मतीशा पथिराना, नुवानिदु फर्नांडो, नुवान तुषारा, दिनेश चांदीमल

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, रवि बिश्नोई, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, दिनेश कार्तिक, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान

श्रीलंका आणि भारताचे संभाव्य संघ:
श्रीलंका: पथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), चरिथ असलंका, दनुष्का गुणथिलका, भानुका राजपक्षे, दसुन शनाका (कर्णधार), वानिंदु हसरंगा, चमिका करुणारत्ने, महिश थीक्षाना, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका

भारत: केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक हुड्डा, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, रवि बिश्नोई, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-

भारताविरुद्ध १९४ धावांची खेळी करणारा फलंदाज, मुलीच्या मृत्यूनंतर लागला होता धार्मिक प्रवचन द्यायला
रैना इज बॅक! सीएसकेची जर्सी घालून सरावात गाळतोय घाम; पाहा व्हिडिओ
अर्शदीप सिंग | गोलंदाजाला समर्थन देण्यासाठी माजी दिग्गजाने थेट प्रोफाईल फोटोच बदलला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---