भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रोमांचक सामना रविवारी (4 सप्टेंबर) चाहत्यांना पाहायला मिळाला. उभय संघातील हा सामना पाकिस्तानने 5 विकेट्स राखून जिंकला. शेवटच्या षटकांमध्ये दोन्ही संघांमध्ये रंगतदार लढत पाहायला मिळाली. यादरम्यानच भारताचा अर्शदीप सिंग याने एक झेल सोडला, जो भारतासाठी महत्वाचा होता. अर्शदीपची ही चूक भारताला महागात पडली असून नेटकरी त्याला ट्रोल करत आहेत. अशात आता अर्शदीपच्या समर्थनार्थ भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्रा समोर आला आहे.
अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याने 18 व्या षटकात हा झेल सोडला. रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) या सामन्यात गोलंदाजी करत होता. षटकातील तिसरा चेंडू पाकिस्तानच्या आसिफ अलीने हवेत मारला, जो थेट अर्शदीपच्या हातात गेला होता. परंतु, अर्शदीप मात्र हा सोपा झेल पकडू शकला नाही. जीवदान मिळाल्यानंतर आसिफ अली (Asif Ali) पुढे 8 चेंडूत 16 धावा केल्या, ज्या पाकिस्तानच्या विजयासाठी महत्वाच्या होत्या. पराभवानंतर नेटकरी अर्शदीपला कारणीभूत धरत असताना भारतीय दिग्गज मात्र त्याच्या पाठीशी उभा राहिल्याचे दिसते. आकाश चोप्रा (Aakash Chopra) या सर्वांचा पाऊल पुढे आहे.
अर्शदीपच्या समर्थनार्थ भारतीय खेळाडूंनी त्यांच्या सोशल मीडिया खात्यांवरून पोस्ट केल्या आहेत. पण आकाशने मात्र थेट त्याच्या ट्वीटरच्या प्रोफाईलला अर्शदीपचा फोटो ठेवला आहे. तत्पूर्वी भारताचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली आणि हरभजन सिंग यांनी अर्शदीपचे समर्थन दिले होते. तसेच माजी अष्टपैलू इरफान पठाण यानेही स्वतःच्या ट्वीटरवर लिहिले की, “अर्शदीप एक दमदार व्यक्तिमत्व आहे. नेहमी असाच राहा.”
#NewProfilePic pic.twitter.com/ksSXCNMOgC
— Aakash Chopra (@cricketaakash) September 5, 2022
Arshdeep is a strong character. Stay that way boy. @arshdeepsinghh
— Irfan Pathan (@IrfanPathan) September 4, 2022
दरम्यान, अर्शदीपने या सामन्यात 3.5 षटकांमध्ये 1 विकेट घेतली आणि 7.04 इकोनॉमी रेटने 27 धावा केल्या. शेवटच्या षटकात त्याला भारतासाठी 6 धावा राखायच्या होत्या, पण पाकिस्तानने हे लक्ष्य गाठलेच. सुपर फोरमधील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारताला पराभूत केले असले तरी, संघाकडे अजून दोन संधी आहेत. भारताला पुढचा सामना 6 सप्टेंबर रोजी श्रीलंकाविरुद्ध खेळायचा आहे. तसेच त्यानंतरचा सामना 8 सप्टेंबर रोजी अफगाणिस्तान संघाविरुद्ध खेळायचा आहे. भारताने जर हे दोन्ही सामने जिंकले, तर संघ अंतिम सामन्यात पोहोचू शकतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
जेमिमाला ‘बर्थ डे’ गिफ्ट! वुमेन्स आयपीएलमध्ये खेळणार मुंबई इंडियन्ससाठी?
VIDEO: जेव्हा टीम इंडिया हारत होती, तेव्हा पाकिस्तानच्या ड्रेसिंगरुममध्ये नक्की चाललं काय होतं?
रिषभ की कार्तिक? कोण आहे टीम इंडियाचा पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक? चाहते विचारतायेत प्रश्न






