श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यातील बहुचर्चित वनडे मालिका तोंडावर आली आहे. आजपासून (१८ जुलै) कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर उभय संघात वनडे मालिकेतील पहिला सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.०० वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे.
या सामन्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) महिनाभर आधीच २० सदस्यीय भारतीय संघ जाहीर केला होता. तसेच श्रीलंका क्रिकेट बोर्डानेही काही दिवसांपुर्वीच त्यांचा संघ घोषित केला आहे. परंतु अद्याप उभय संघांची प्लेइंग इलेव्हनची घोषणा होणे बाकी आहे. त्यामुळे या सामन्यात भारत आणि श्रीलंका संघ कोणत्या ११ खेळाडूंना खेळवतील? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.
कधी होणार सामना
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिला वनडे सामना आज म्हणजेच १८ जुलै रोजी होणार आहे.
कुठे होणार सामना
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिला वनडे सामना आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे होईल
किती वाजता होणार सामना
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिला वनडे सामना दुपारी ३ वाजता सुरु होईल. त्यामुळे नाणेफेक २.३० वाजता होईल.
कसा पाहता येईल सामना
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिला वनडे सामना टिव्हीवरील सोनी स्पोर्ट्स चॅनलवर पाहता येतील. तसेच डीडी स्पोर्ट्स चॅनलवरही सामन्याचे थेट प्रक्षेपण होईल. ऑनलाईन सामना पाहण्यासाठी सोनी लिव्ह ऍपचा वापर करता येईल.
भारताचा संभाव्य संघ
श्रीलंका दौऱ्यावरील भारतीय संघात कर्णधार शिखर धवनसह पृथ्वी शॉ सलामीला फलंदाजी करताना दिसू शकतो. मधल्या फळीत तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादवला पाठवले जाऊ शकते. त्याच्यानंतर मनिष पांडेला पाठवले जाऊ शकते. तसेच यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन या सामन्याद्वारे वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतो. सॅमसनवर मधल्या फळीत संघाचा डाव सावरण्याबरोबर यष्टीरक्षणाचीही जबाबदारी असेल.
अष्टपैलू विभागात हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या हे दोन्ही बंधू खेळताना दिसतील. अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याचे संघातील स्थान जवळपास निश्चित आहे. त्याच्या जोडीला दिपक चाहर वेगवान गोलंदाजी करेल. तसेच युवा गोलंदाज चेतन सकारिया याला पदार्पणाची संधी मिळू शकते. तर फिरकी विभागात कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांना जागा मिळेल.
श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हनः शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, मनीष पांडे, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, दिपक चाहर, युजवेंद्र चहल, कुलीदप यादव






