भारतीय संघाचा 21 वर्षीय फलंदाज यशस्वी जयसवाल याने कसोटी पदार्पणात चमकदार कामगिरी केली. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्याच कसोटीच्या दुसऱ्या डावात शानदार शतक झळकावले. आता त्याच्या नजरा द्विशतकावर आहेत. असे असले, तरीही सध्या सोशल मीडियावर जयसवालचा एक खळबळजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दिसते की, यशस्वी जयसवालने वेस्ट इंडिजच्या खेळाडूला शिवी दिली. जयसवालच्या या वागण्याला काहींनी पाठिंबा दर्शवला आहे, तर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे.
नेमकं काय घडलं?
सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत दिसते की, यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) आणि विराट कोहली (Virat Kohli) एक धाव घेण्यासाठी धावत असतात. यादरम्यान जयसवालच्या समोर एक खेळाडू येतो. मात्र, त्याने त्या खेळाडूचे नाव घेतले नाही, पण केमार रोच त्याच्या समोर येताना दिसत आहे. यानंतर जयसवाल त्याला शिवीगाळ करत विराटला सांगतो की, तो समोर आला होता.
https://twitter.com/mufaddl_vora/status/1679591039798067200?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1679591039798067200%7Ctwgr%5Ec649f55ae8909d23f97ee39909551a8a42b0bc51%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-india-vs-west-indies-1st-test-yashasvi-jaiswal-abuses-west-indies-player-after-scoring-century-viral-video-6878291.html
सामन्याविषयी थोडक्यात
डॉमिनिका येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याविषयी बोलायचं झालं, वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 150 धावा केल्या होत्या, तर भारताने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 2 विकेट्स गमावत 312 धावा केल्या आहेत. कर्णधार रोहित शर्मा यानेही 103 धावांची शतकी खेळी केली. तसेच, 21 वर्षीय यशस्वी जयसवाल नाबाद 143 धावांवर खेळत आहे. विराट कोहली हा 36 धावांवर नाबाद आहे. अशाप्रकारे भारतीय संघाकडे 162 धावांची आघाडी आहे.
सलग नववा कसोटी मालिका जिंकण्यावर नजर
वेस्ट इंडिज विरुद्ध भारत (West Indies vs India) संघात एकूण 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. फिरकीसाठी फायदेशीर दिसणारी खेळपट्टी पाहता भारतीय संघ चांगल्या स्थितीत पोहोचला आहे. पहिल्या डावात फिरकीपटू आर अश्विन याने 5 विकेट्स, तर रवींद्र जडेजा याने 3 विकेट्स घेतल्या होत्या. दोघेही दुसऱ्या डावात यजमान संघाच्या फलंदाजांना संघर्ष करायला भाग पाडू शकतात.
विशेष म्हणजे, भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध आतापर्यंत सलग 8 कसोटी मालिका जिंकला आहे. आता संघाच्या नजरा 9व्या विजयावर आहेत. ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023-25 सायकलमधील भारत आणि वेस्ट इंडिज संघाची पहिली मालिकाही आहे. भारतीय संघ पहिल्या दोन्ही डब्ल्यूटीसी हंगामाच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्यात यशस्वी झाला होता. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला. आता तिसऱ्या हंगामातील भारताच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल. (india vs west indies 1st test youngster yashasvi jaiswal abuses west indies player after scoring century see video)
महत्वाच्या बातम्या-
परदेशात खेळताना रोहितचा नाद करायचा नाय! 10वे कसोटी शतक ठोकत गावसकरांचा विक्रमही काढला मोडीत
तिसऱ्या क्रमांकावर गिलची चिरफाड, दिग्गजांचा सल्ला घेऊनही सपशेल फ्लॉप; अवघ्या 6 धावांवर परतला तंबूत