भारत आणि वेस्ट इंडीज (ind vs wi t20 series) संघांमध्ये तीन दिवसांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना कोलकत्ताच्या इडन्स गार्डन्सवर पार पडला. हा सामना भारतीय संघाने ८ धावांनी जिंकला. या सामन्यात पाहुण्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामना सुरु होण्यापुर्वी सर्व खेळाडू मैदानात गुडघ्यावर बसले. तेव्हा भारतीय खेळाडूंनी(team india) गुडघ्यावर न बसता जे कृत्य केल ते पाहून त्यांचे कौतुक केले जात आहे.
ब्लॅक लाइव्ह मॅटर्सबाबत गेल्या वर्षी जगभरात सुरू झालेल्या आंदोलनापासून अनेक क्रिकेट संघांनी सामन्यापूर्वी गुडघे टेकून आंदोलनाला पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. टी२० विश्वचषकादरम्यान सुद्धा हे पाहायला मिळाले. वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि इतर अनेक संघ सामना सुरू होण्यापूर्वी गुडघ्यावर बसून मोहिमेला पाठिंबा देत आहेत. परंतु भारतीय संघ अनेकदा छातीवर हात ठेवून, गुडघ्यावर बसून या मोहिमेला आपला पाठिंबा व्यक्त करतो.
टी२० विश्वचषकादरम्यान अनेक सामन्यांमध्ये भारतीय संघ गुडघ्यावर बसला होता. कोलकत्ता येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात खेळ सुरू होणार असतानाच वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी आणि पंचांनी गुडघे टेकून पाठिंबा दिला. तर त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या इशान किशनने छातीवर हात ठेवला.
हेही वाचा- विराट, रिषभच्या अर्धशतकांच्या जोरावर दुसऱ्या टी२०त भारताचा ८ धावांनी विजय, मालिकाही खिशात
कोलकाता येथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा टी२० सामना खेळला गेला आहे. या मालिकेत भारतीय संघाने २-० ने मालिकेत आघाडी घेतली आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणारे तीनही टी२० सामने कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होणार आहेत. तिसरा सामना २० फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे.
इशान किशन, रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांना दुसऱ्या टी२० सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयश आले असले तरी विराट कोहली व रिषभ पंत यांनी भारतीय संघाचा डाव सावरला. विराटने ४१ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ५२ धावा केल्या. रिषभ २८ चेंडूंत ५८ धावांवर नाबाद राहिला, तर व्यंकटेश अय्यर १८ चेंडूंत ३३ धावांवर माघारी परतला. रिषभ आणि व्यंकटेश अय्यर यांनी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना त्रासून सोडले. या दोघांनी ३५ चेंडूंत ७६ धावांची भागीदारी करून भारतीय संघाला ५ बाद १८६ धावांपर्यंत मजल मारून दिली. लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडीज संघ १७८ धावांवरच गारद झाला.
महत्त्वाच्या बातम्या-
विराट, रिषभच्या अर्धशतकांच्या जोरावर दुसऱ्या टी२०त भारताचा ८ धावांनी विजय, मालिकाही खिशात
शिष्य गुरूवर भारी! केवळ तिसरे टी२० अर्धशतक ठोकूनही पंत धोनीला मागे टाकत बनला अव्वल यष्टीरक्षक
VIDEO: हिटमॅनने मारला असा षटकार की चाहत्यांना आली रिषभची आठवण