अहमदाबाद। भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघात शुक्रवारी (११ फेब्रुवारी) ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील (ODI Series) अखेरचा सामना (3rd ODI) झाला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
या सामन्याच्या निकालाने मालिका विजयावर फारसा फरक पडणार नव्हता. कारण, या मालिकेतील पहिले दोन्ही सामने रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने जिंकले होते आणि मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली होती. त्यामुळे अखेरच्या सामन्यात भारताला विजयासाठी वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश देण्याची संधी होती, तर वेस्ट इंडिज प्रतिष्ठा वाचवण्यासाठी मैदानात उतरले होते.
या सामन्यासाठी ११ जणांच्या भारतीय संघात चार बदल करण्यात आले. भारतीय संघाने उपकर्णधार केएल राहुल, अष्टपैलू दीपक हुडा, वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि फिरकीपटू युजवेंद्र चहलला ११ जणांमधून बाहेर केले, तर त्यांच्याऐवजी कुलदीप यादव, श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि शिखर धवन यांना ११ जणांच्या संघात संधी देण्यात आली.
वेस्ट इंडिजने ११ जणांच्या संघातून अकिल हुसैनला बाहेर केले असून हेडन वॉल्शला संधी दिली आहे. तसेच या सामन्यातून देखील नियमित कर्णधार कायनर पोलार्ड दुखापतीमुळे बाहेर आहे. त्याच्याऐवजी वेस्ट इंडिजचेप्रभारी कर्णधारपद निकोलस पूरन सांभाळेल.
असे आहेत ११ जणांचे संघ
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, दीपक चाहर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
वेस्ट इंडिज – शाय होप (यष्टीरक्षक), ब्रेंडन किंग, डॅरेन ब्राव्हो, शमारह ब्रूक्स, निकोलस पूरन (कर्णधार), जेसन होल्डर, फॅबियन ऍलन, ओडियन स्मिथ, अल्झारी जोसेफ, हेडन वॉल्श, केमार रोच.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल लिलावापूर्वी बीसीसीआयचा मोठा निर्णय! ३ खेळाडूंच्या गोलंदाजीवर बंदी, तर १० जणांवर करडी नजर
हिटमॅनला पराक्रमाची संधी! अवघ्या १४ धावा करताच तोडणार गांगुली-तेंडुलकरचा मोठा विक्रम
‘माझं क्रेडिट दुसऱ्यांनीच घेतलं,’ असं म्हणणाऱ्या रहाणेने पाहा नक्की कुणावर साधलाय निशाणा