भारतीय संघ बांगलादेश विरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर पुढील महिन्यात वेस्ट इंडीज विरुद्ध 3 टी20 आणि 3 वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. यातील वनडे मालिकेसाठी मर्यादीत षटकांच्या भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माला(Rohit Sharma) विश्रांती(rest) दिली जाण्याची दाट शक्यता आहे.
रोहित यावर्षीच्या सुरुवातीपासून सातत्याने क्रिकेट खेळत आहे. यामध्ये आयपीएलच्या 16 सामन्यांचाही समावेश आहे. त्यामुळे यावर्षी तो 60 पेक्षाही अधिक सामने खेळला आहे. त्याचबरोबर तो आता कसोटी संघातीचाही नियमित सदस्य बनला आहे.
या कारणामुळेच त्याचा ताण कमी करण्यासाठी त्याला विंडीज विरुद्धच्या 15 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या वनडे मालिकेतून विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.
मात्र मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार रोहित शर्माची क्रिकेटमधून विश्रांती घेण्याची इच्छा नाही. परंतू भारताच्या आगामी मालिकांंचा विचार करता संघव्यवस्थापन रोहितला विंडीज विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी विश्रांती घेण्यास सांगू शकतात.
वेस्ट इंडीज विरुद्धच्या वनडे आणि टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यासाठी निवड समीती 21 नोव्हेंबरला कोलकाता येथे बैठक घेणार आहे.
वेस्ट इंडीज विरुद्ध वनडे मालिकेआधी भारतीय संघ 6 डिसेंबरपासून 3 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे.
वेस्ट इंडीज विरुद्धच्या मालिकांनंतर जानेवारीमध्ये श्रीलंका संघ 3 टी20 सामने खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. त्यानंतर भारतीय संघ 5 टी20, 3 वनडे आणि 2 कसोटी सामन्यांच्या मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे.
भारतीय संघ यावर्षी सुरुवातीपासून सातत्याने मालिका खेळत आहेत. त्यामुळे संघातील खेळाडूंना नियमित कालांतराने विश्रांती दिली जात आहे. नुकतीच बांगलादेश विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती.
पहिल्या दिवस-रात्र कसोटीसाठी भारतीय संघ करतोय असा सराव, पहा व्हिडिओhttps://t.co/vKLMKCdQqK#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #TeamIndia #INDvsBAN #DayNightTest
— Maha Sports (@Maha_Sports) November 19, 2019
या खेळाडूने केले अवघ्या १४ चेंडूत अर्धशतक करत रचला मोठा विक्रम
वाचा👉https://t.co/LrcN9Wg3g6👈#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #TeamIndia— Maha Sports (@Maha_Sports) November 19, 2019