भारतीय संघ शुक्रवारपासून वेस्ट इंडिज दौऱ्याला सुरुवात करणार आहे. या दौऱ्याची सुरुवात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेने होईल आणि त्यानंतर पाच सामन्यांची टी-२० मालिका होईल. या मालिकेत चांगली कामगिरी करून भारतीय संघ आपली स्थिती आणखी मजबूत करू शकतो. संघातील स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीत शिखर धवनची तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. या मालिकेसाठी नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि रिषभ पंत यांना विश्रांती देण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वरिष्ठ निवड समितीने एकदिवसीय सामन्यांसाठी १६ सदस्यीय भारतीय संघाची निवड केली. तिन्ही एकदिवसीय सामने पोर्ट ऑफ स्पेनमध्ये खेळवले जातील.
होल्डरचे वेस्ट इंडिज संघात पुनरागमन
माजी कर्णधार जेसन होल्डरने भारताविरुद्ध २२ जुलैपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी वेस्ट इंडिजच्या १३ सदस्यीय संघात पुनरागमन केले आहे. अनुभवी अष्टपैलू खेळाडू बांगलादेशविरुद्धच्या मागील घरच्या टी२० मालिकेत वेस्ट इंडिज संघाचा भाग नव्हता परंतु क्रिकेट वेस्ट इंडीज निवड समितीने त्याला भारताविरुद्धच्या मालिकेसाठी परत बोलावण्याचा निर्णय घेतला.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना कधी खेळला जाईल?
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला वनडे सामना २२ जुलै (शुक्रवार) रोजी होणार आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना कोठे खेळवला जाईल?
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील हा सामना त्रिनिदादच्या क्वीन्स पार्क ओव्हल स्टेडियमवर होणार आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना कधी सुरू होईल?
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील हा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल, तर सामन्याचा नाणेफेक संध्याकाळी ६.३० वाजता होईल.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडला गेलेला भारतीय संघ –
शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान , प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदिप यादव, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘या’ दिग्गजाला श्रेयसमध्ये दिसतोय भारताचा ‘फ्युचर कॅप्टन’; दिले हे कारण
कॅरेबियन भूमीवर कॅप्टन शिखरकडे धोनी-रोहितला मागे टाकण्याची संधी; हे विक्रम करेल स्वतःच्या नावे