---Advertisement---

कर्णधार विराट कोहली पुन्हा नाराज, ही गोष्ट क्रिकेटमध्येच नको

---Advertisement---

हैदराबाद | भारतीय संघ घरच्या मैदानावर खेळत असताना एसजी कंपनीचा (भारतीय बनावटीचा) चेंडू वापरत असतो. त्या आधी 90 च्या  दशकाच्या सुरुवातीला भारतात साॅनेक्स कंपनीचा चेंडू कसोटी सामन्यांसाठी वापरला जायचा.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली एसजी चेंडू वापरण्यावर नाराजी दर्शवली आहे. जगभरात कसोटी क्रिकेट ड्यूक चेंडूवर (इंग्लिश बनावटीचा) खेळले जात असताना भारतात एसजी कंपनीचे कमी दर्जाचे चेंडू वापरले जातात.

”ड्यूक चेंडू हा कसोटी क्रिकेटसाठी सर्वात योग्य आहे. माझ्या अनुभवानूसार ड्यूक चेंडू फिरकी गोलंदाजासाठी सुद्धा योग्य आहे. त्याला असणाऱ्या नक्षीमुळे देखील तो चांगल्या पद्धतीने स्पिन करता येतो.” असे विराट म्हणाला.

सध्या  कसोटी क्रिकेट खेळताना कोणता चेंडू वापरावा या संबधी आयसीसीच्या कोणत्याही मार्गदर्शक सुचना नाहीत.

वेगवेगळ्या देशांचे क्रिकेट मंडळ वेगवेगळे चेंडू वापरत आहेत. बीसीसीआय भारतीय बनावटीचे एसजी टेस्ट हा चेंडू वापरत आहे. इंग्लड आणि विंडिजचे संघ ड्यूक कंपनीचा चेंडू वापरतात. पाकिस्तान, आॅस्ट्रेलिया आणि श्रीलंका हे कूकाबुरा चेंडू वापरत आहेत.

“एसजीच्या कसोटी क्रिकेटमधील चेंडूपेक्षा आपल्याला कूकाबुरा चेंडूने गोलंदाजी करायला चांगले वाटते.”  असे  भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडू आर अश्विनने म्हटले होते.

अश्विनच्या तक्रारीवर कोहलीला विचारले असता त्याने अश्विनला पाठिंबा देताने म्हटले. “मी त्याच्या मताशी सहमत आहे. पहिल्या 5 षटकानंतर चेंडूवर छोटे-छोटे खड्डे पडतात. असे मी कधीही पाहिले नव्हते. आधी चेंडूचा दर्जा चांगला होता मात्र आता चेंडूचा दर्जा का खालावला आहे हे लक्षात येत नाही.”

“चेंडू जर कठीण राहिला तर त्याचा फायदा जलगती गोलंदाजाला होतो. त्याने गोलंदाजाली जास्तीची गती मिळते. पण जर 10-12 षटकानंतर चेंडू मऊ झाल्यानंतर 20 टक्के अतिरिक्त प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे चेंडूचा दर्जा चांगला पाहिजे.” असेही विराटने सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment