---Advertisement---

झिम्बाब्वेला पराभवासह शेवट करावा लागणार? ‘हा’ धाकड भारतीय खेळाडू तिसऱ्या वनडेत खेळणार

On: सोमवार, ऑगस्ट 22, 2022 10:55 AM
Deepak-Chahar-KL-Rahul
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ झिम्बाब्वेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत २-० ने विजयी आघाडीवर आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना सोमवारी (२२ ऑगस्ट) रंगणार आहे. हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२.४५ वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी पुढे येत आहे. भारताचा फॉर्मात असलेला वेगवान गोलंदाज दीपक चाहर याच्याबाबत महत्त्वाची अपडेट पुढे आली आहे.

झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यातून चाहरला बाहेर करण्यात आले होते. चाहरने झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यातून ६ महिन्यांनंतर भारतीय संघात पुनरागमन केले होते. या पुनरागमनाच्या सामन्यात त्याने मॅच विनिंग प्रदर्शन करत सामनावीर पुरस्कारही जिंकला होता. या सामन्यात त्याने ७ षटके फेकताना अवघ्या २७ धावा देत ३ विकेट्स घेतल्या होत्या. पहिल्या १० षटकात संघाला ३ महत्त्वपूर्ण विकेट्स त्याने मिळवून दिल्या होत्या. या उल्लेखनीय प्रदर्शनानंतरही चाहरला बाहेर बसवण्याचा निर्णय घेत कर्णधार राहुलने सर्वांनाच अचंबित केले होते.

परंतु आता तिसऱ्या वनडे सामन्यातून पुन्हा संघात परतत चाहर भारताला ३-० ने वनडे मालिका जिंकून देण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतो. चाहरबद्दल अपडेट देताना बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, चाहरला दुखापत वगैरे झाली नसून तो पूर्णपणे बरा आहे. दुखापतीनंतर ६ महिन्यांच्या ब्रेकनंतर चाहर पुन्हा मैदानावर उतरला आहे. त्यामुळे त्याच्यावर अचानक जास्त वर्कलोड टाकता येणार नाही. याच कारणास्तव दक्षता म्हणून त्याला संघाबाहेर बसवण्यात आले आहे. संघ व्यवस्थापन आणि फिजिओंची इच्छा नाही की, त्याने दीर्घ विश्रांतीनंतर जास्त घाई करावी. त्याला विश्रांतीची गरज आहे. पण तो तिसऱ्या वनडे सामन्यात खेळू शकतो.” 

दरम्यान भारतीय संघाने झिम्बाब्वेला पहिल्या वनडे सामन्यात १० विकेट्सने पराभूत केले होते. त्यानंतर दुसरा वनडे सामना भारताने ५ विकेट्सने जिंकला. आता तिसऱ्या वनडे सामन्यातही विजय मिळवत झिम्बाब्वेला व्हाईटवॉश देण्यावर भारतीय संघाची नजर असेल.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-

तिसऱ्या वनडे सामन्यात पावसाची शक्यता? जाणून घ्या काय सांगतोय वातावरणचा अहवाल
हार्दिक आणि पत्नी नताशाचा ‘विषयच हार्ड’! रोमँटिक पोज देत स्विमिंग पूलमध्ये लावली आग
‘तिसऱ्या वनडेत दीपक चाहर खेळणार?’ बीसीसीआय अधिकाऱ्याने केला खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---