भारत आणि बांगलादेश महिला संघांमध्ये मंगळवारी (२२ मार्च) आमना सामना झाला. न्यूझीलंडमध्ये खेळल्या जात असलेल्या महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या २२ व्या सामन्यात भारताने बांगलादेशला ११० धावांनी पराभूत केले. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २२९ धावा केल्या होत्या. यादरम्यान बांगलादेश संघाने भारताच्या फलंदाजीवेळी असे ५ चेंडू टाकले, ज्यामुळे सामन्याचे चित्र पूर्णपणे पालटले आणि भारतीय संघ अपेक्षित धावसंख्येपर्यंत पोहचू शकला नाही.
सलामीवीर स्मृती मंधाना (smriti mandhana) आणि शेफाली वर्मा (shafali verma) यांनी भारताला चांगली सुरुवात दिली. दोघींनी पहिल्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी केली. १४.५ षटकांमध्ये भारताने एकही विकेट न गमावता ७४ धावा केल्या होत्या आणि पुढे १६ व्या षटकाच्या शेवटीपर्यंत संघाची धावसंख्या ३ विकेट्सच्या नुकसानावर ७४ धावा झाली होती. १५ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मंधानाच्या रूपात भारताला पहिला झटका लागला. नहिदा अख्तरने टाकलेल्या चेंडूवर मंधाना फरगना हकच्या हातून झेलबाद झाली.
पहिली विकेट गमावल्यानंतरही भारतीय संघाला शेफाली वर्मा खेळपट्टीवर उपस्थित असल्याचे समाधान होते, कारण तोपर्यंत ती खेळपट्टीवर सेट झाली होती. त्यानंतर १६ व्या षटकात रितू मोनी गोलंदाजी करण्यासाठी आली. रितूच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर शेफालीने विकेट मगावली आणि भारताला दुसरा झटका लागला. बांगलादेशी यष्टीरक्षकाने शेफालीला यष्टीचीत करून मैदानाबाहेर पाठवले. त्यानंतर कर्णधार मिताली राज (mithali raj) पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाली. फातिमा खातूनने मितालीचा सोपा झेल घेतला. अशा प्रकारे बांगलादेशने अवघ्या ५ चेंडूत भारतीय संघाच्या अतिशय महत्वाच्या तीन विकेट्स घेतल्या होत्या.
https://www.instagram.com/reel/CbY4m_elwAI/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकांमध्ये ७ विकेट्सच्या नुकसानावर २२९ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशने ४०.३ षटकांमध्ये ११९ धावा केल्या आणि त्यांच्या संपूर्ण संघ गुंडाळला गेला. या विजयानंरत भारताच्या उपांत्य सामन्यात पोहचण्याच्या आशा अजूनही कायम आहेत.
महत्वाच्या बातम्या –
आधी फ्लाइंग किस, मग गप्प राहण्याचा इशारा; बांगलादेशी गोलंदाजाचा लय भारी जल्लोष
आयपीएलच्या ‘दादा’ संघाचा ‘राजा’, मुंबई इंडियन्सने शेअर केला रोहितचा खास PHOTO, फोटो एक विचार अनेक
आयपीएलच्या ‘दादा’ संघाचा ‘राजा’, मुंबई इंडियन्सने शेअर केला रोहितचा खास PHOTO, फोटो एक विचार अनेक