भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने ७ गडी राखून मोठा विजय मिळवला होता. त्यानंतर या मालिकेतील दुसरा वनडे सामना आज (२० जुलै) खेळला जाणार आहे. या सामन्यातही भारतीय संघाचे पारडे जड आहे. पहिल्या वनडे सामन्यात पदार्पणवीर इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी तुफान फटकेबाजी केली होती. तसेच सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉने देखील संघाला वेगवान सुरुवात करून दिली होती. त्यामुळे असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, दुसऱ्या सामन्यातही भारताची हीच प्लेइंग इलेव्हेन मैदानात उतरू शकते.
देवदत्त पडिक्कलला मिळणार संधी?
आपल्या कारकिर्दीतील पहिलाच सामना खेळत असलेल्या इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी पहिल्या चेंडुपासूनच तुफान फटकेबाजी करायला सुरुवात केली होती. श्रीलंका संघातील गोलंदाज या फलंदाजांसमोर कमजोर असल्याचे दिसून आले होते. भारतीय संघाने हा सामना ३७ व्या षटकात आपल्या नावावर केला होता. त्यामुळे दुसऱ्या वनडे सामन्यातही क्वचितच भारतीय संघात बदल पाहायला मिळू शकेल.
हा सामना जर जिंकला तर भारतीय संघ वनडे मालिकाही जिंकेल. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात संघात बदल पाहायला मिळू शकतो. तिसऱ्या वनडे सामन्यात मनीष पांडेचे स्थान धोक्यात येऊ शकते. कारण पहिल्या वनडे सामन्यात त्याने ४० चेंडू खेळून अवघ्या २६ धावा केल्या होत्या. त्याच्याऐवजी देवदत्त पडिक्कलला संधी देण्यात येऊ शकते. (India will aim to stamp authority over srilanka in second odi devdutt padikkal can replace manish pandey)
भुवनेश्वर कुमारकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा
भारतीय संघात पुनरागमन करत असलेल्या पृथ्वी शॉने पहिल्याच सामन्यात ताबडतोड फलंदाजी करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. तसेच गेल्या काही महिन्यांपासून संघात स्थान मिळवण्यासाठी धडपड करत असलेली ‘कुल-चा’ जोडी पहिल्या वनडे सामन्यात एकत्र खेळताना दिसून आली होती. दोघांनी मिळून संघाना महत्वाचे गडी देखील बाद करून दिले होते. तसेच गेल्या काही महिन्यांपासून गोलंदाजी करत नसलेला हार्दिक पंड्या या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करताना दिसून आला.
परंतु भारतीय संघाचा उपकर्णधार भुवनेश्वर कुमार हा या सामन्यात साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला होता. त्याला एकही गडी बाद करण्यात यश आले नव्हते. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीलंका वि. भारत दुसरा वनडे सामना कोठे आणि कधी होणार? जाणून घ्या सर्वकाही
स्टीव्ह स्मिथने सांगितले आजवरच्या सर्वोत्कृष्ट विरोधी क्रिकेटपटूचे नाव, ‘या’ भारतीयाला मिळाला मान
श्रेयसची मैदानात उतरण्याची प्रतीक्षा लांबली, ‘या’ महत्त्वपूर्ण स्पर्धेतून घेतली माघार