आयसीसी वनडे क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला 21 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या विंडीज विरुद्धच्या पाच वनडे मालिकेत 950 आंतरराष्ट्रीय वनडे सामने पूर्ण करण्याची संधी आहे. असा पराक्रम करणारा भारत हा पहिलाच संघ ठरेल.
भारताने सहा देशांविरुद्ध 50 पेक्षा अधिक वनडे सामन्यांत विजय मिळवला आहे. तर 21व्या शतकात विंडीज विरुद्ध भारताची वनडे सामने जिंकण्याची टक्केवारी 60% आहे.
तसेच विंडीजने 780 वनडे सामने खेळले आहेत. त्याचप्रमाणे 900 वनडे सामने खेळऱ्यामध्ये ऑस्ट्रेलियन संघाचा दुसरा क्रमांक लागतो. त्यांनी 916 वनडे सामने खेळले आहे.
भारताने पहिला वनडे सामना 1974 ला तर विंडीजने 1973 खेळला होता. भारताची पहिली वनडे मालिका इंग्लंड विरुद्ध होती. दोन सामन्यांच्या या मालिकेत भारताला दोनही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने 1974 पासून वनडे सामने खेळायला सुरूवात केली. यामध्ये ऑस्ट्रेलियाने 916 तर इंग्लंडने 718 वनडे सामने खेळले आहे. तसेच पाकिस्तानलाही 900 वनडे सामने पूर्ण करण्याची संधी आहे. त्यांनी आतापर्यंत 899 वनडे सामने खेळले आहेत.
भारताने आतापर्यंत 948 वनडे सामन्यांत खेळताना 489 जिंकले असून 411 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यातील 8 सामने बरोबरीत सुटले तर 40 सामने अनिर्णीत राहिले.
विंडीज विरुद्ध भारताने एकूण 121 वनडे सामने खेळले आहेत. भारताने यातील 56 सामन्यांत विजय तर 61 सामन्यांत पराभव तसेच एक बरोबरीत आणि तीन सामन्यांचा निकालच लागला नाही.
महत्त्वाच्या बातम्या:
–असा ‘कहर’ रनआऊट तूम्ही क्रिकेटच्या इतिहासात पाहिला नसेल!
–कसोटी पदार्पणातच १८ विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजाचा आज ५०वा वाढदिवस
–पृथ्वी शाॅ- श्रेयस अय्यरच्या फलंदाजीच्या जोरावर मुंबई विजय हजारे ट्राॅफीच्या अंतिम फेरीत