fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने प्रो कबड्डीत मोडला अनुप व अजयचा विक्रम

सिद्धार्थ देसाई या नावाची प्रो कबड्डी सीजन 6 सुरू झाल्या पासून जोरदार चर्चा आहे. राष्ट्रीय स्पर्धेत आपल्या खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या सिद्धार्थ देसाईला यु मुंबाने प्रो कबड्डी सीजन 6 साठी आपल्या संघात घेतले.

यु मुंबाच्या पहिल्याच सामन्यात सिद्धार्थ देसाईने सुपरटेन पूर्ण करत जोरदार पर्दापण केले. पहिल्या तीन सामन्यात सिद्धार्थ देसाईने २ सुपरटेन सह एकूण ३६ गुण मिळवले होते. प्रो कबड्डीत चढाईत सर्वात जलद ५० गुण पूर्ण करण्यासाठी चौथ्या सामन्यात त्याला १४ गुणांची आवश्यकता होती.

काल झालेल्या यु मुंबा विरुद्ध हरियाणा स्टीलर्स सामन्यात सिद्धार्थ देसाईने दोन सुपररेड सह चढाईत १५ गुण मिळवले आणि प्रो कबड्डीच्या इतिहासात पदार्पणानंतर सर्वात कमी सामन्यात चढाईत ५० गुण पूर्ण करण्याचा पराक्रम केला. सिद्धार्थने पदार्पणापासून आपल्या पहिल्या केवळ ४ सामन्यात चढाईत जलद ५० गुण पूर्ण केले.

प्रो कबड्डीत याआधी अनुप कुमार व अजय ठाकूर यांनी चढाईत ५० गुण मिळवण्यासाठी ५ सामने खेळले होते. आता हा रेकॉर्ड युवा चढाईपटू सिद्धार्थ देसाईच्या नावावर झाला आहे.

प्रो कबड्डीत पर्दापणनंतर कमी सामन्यात चढाईत ५० गुण पूर्ण करणारे खेळाडू:

१) सिद्धार्थ देसाई – ४ सामने
२) अनुप कुमार – ५ सामने
३) अजय ठाकूर – ५ सामने

सिद्धार्थ देसाईची पहिल्या ४ सामन्यातील कामगिरी:

सामने – ४
चढाईत गुण -५१
सुपर टेन – ०३
सुपर रेड – ०२
सरासरी गुण – १२.७५

महत्त्वाच्या बातम्या:

असा ‘कहर’ रनआऊट तूम्ही क्रिकेटच्या इतिहासात पाहिला नसेल!

कसोटी पदार्पणातच १८ विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजाचा आज ५०वा वाढदिवस

पृथ्वी शाॅ- श्रेयस अय्यरच्या फलंदाजीच्या जोरावर मुंबई विजय हजारे ट्राॅफीच्या अंतिम फेरीत

You might also like