आयसीसीने येणाऱ्या काळातील तीन मोठ्या स्पर्धांचे आयोजन भारतावर सोपवले आहे. मंगळवारी (१६ नोव्हेंबर) आयसीसीने येणाऱ्या काळातील (२०२४ ते २०३१) ८ महत्वाच्या स्पर्धांची घोषणा केले आहे. आयसीसीने या स्पर्धा कधी आणि कोणत्या कोणत्या देशांमध्ये खेळल्या जातील याची संपूर्ण माहिती दिली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या यादीत भारतावर तीन मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. तर पाकिस्तानवरही बऱ्याच काळांनंतर एक महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
आयसीसीने भारताला तीन स्पर्धांच्या आयोजनाची संधी दिली आहे. यामध्ये २०२६ टी-२० विश्वचषक, २०२९ चॅम्पियंस ट्रॉफी आणि २०३१ च्या एकदिवसीय विश्वचषकाचा समावेश आहे. तत्पूर्वी २०२१ चा टी-२० विश्वचषक भारताच्याच आयोजनात पार पडला आहे आणि २०२३ मधील एकदिवसीय विश्वचषकही भारातातच आयोजित केला जाणार आहे. पाकिस्तानला मोठ्या कालखंडानंतर आयसीसी स्पर्धेच्या आयोजनाची संधी मिळाली आहे, ते २०२५ च्या चॅम्पियंस ट्रॉफीचे आयोजन करतील.
आयसीसीने घोषित केल्याप्रमाणे २०२४ मध्ये होणारा टी-२० विश्वचषक वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत आयोजित केला जाणार आहे. अमेरिकेला ही संधी २०२८ लॉस एंजलिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर दिली गेली आहे. २०२८ साली ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश केला जाऊ शकतो. तसेच २०२५ च्या चॅम्पियंस ट्रॉफीचे आयोजन पाकिस्तानमध्ये आणि २०२६ टी-२० विश्वचषकाचे आयोजन भारत आणि श्रीलंकेत केले जाणार आहे.
आयसीसीने २०२७ मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या आयोजनाची जबाबदारी जिम्बाब्वे, नामिबिया आणि दक्षिण अफ्रिका या देशांवर दिली आहे. त्यानंतर २०१८ मधील टी-२० विश्वचषक न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जाईल. तसेच २०२९ मध्ये आयसीसीने पुन्हा एकदा भारतावर विश्वास दाखवला आहे. यावेळी भारतात चॅम्पियंस ट्रॉफीचे आयोजन केले जाईल.
Are you ready for the best-ever decade of men’s white-ball cricket?
Eight new tournaments announced 🔥
14 different host nations confirmed 🌏
Champions Trophy officially returns 🙌https://t.co/OkZ2vOpvVQ pic.twitter.com/uwQHnna92F— ICC (@ICC) November 16, 2021
आयसीसीने प्रत्येक दोन वर्षांनी टी-२० विश्वचषकाचे आयोजन करणार आहे. २०३० मध्ये होणार टी-२० विश्वचषक इंग्लंड, आयर्लंड आणि स्कॉयलंडमध्ये खेळला जोईल. २०३१ मध्ये पुन्हा एकाद आयसीसीसी एकदिवसीय विश्वचषकाचे आयोजन भारतात केले जाईल. अशाप्रकारे आगामी काळातील एकूण ८ महत्वाच्या आयसीसी स्पर्धा १२ देशांमध्ये आयोजित केल्या जातील.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाने वॉनची ‘ती’ भविष्यवाणी ठरवली खोटी, गोलंदाज झम्पाने भन्नाट पोस्ट करत लगावली चपराक
एनसीएच्या अध्यक्षपदी वीवीएस लक्ष्मण यांचीच लागणार वर्णी! सनरायझर्स हैदराबादनेही केलीय पुष्टी