कोरोना व्हायरसच्या संकटामुळे जवळजवळ मागील २ महिन्यांपासून क्रीडा क्षेत्र देखील ठप्प झाले आहे. पण आता हळुहळु ते सुरु करण्याच्या दिशेने पाऊले उचलली जाऊ लागली आहेत. येत्या ऑगस्टमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात टी२० मालिका होण्याची शक्यता आहे.
इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार दक्षिण आफ्रिकेमध्ये ऑगस्टच्या अखेरीस ३ सामन्यांची टी२० मालिका खेळण्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेने सहमती दर्शवली आहे. तसेच दोन्ही बाजूच्या सरकारने काही नियमांच्या अंतर्गत ही मालिका आयोजित करण्याची परवानगी दिली आहे.
आयसीसीच्या भविष्यातील वेळापत्रकामध्ये या मालिकेचा समावेश नसला तरी फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिका बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या भारत दौऱ्यादरम्यान दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट संचालक ग्रॅमी स्मिथ आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने याबद्दल चर्चा केली होती. याबद्दल काल टेलिकॉन्फरन्सद्वारे अंतिम निर्णय घेण्यात आला.
याआधी फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. मात्र पहिला वनडे सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर उर्वरित सामनेही कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आले होते. तेव्हापासून भारतीय संघ अजून एकही सामना खेळलेला नाही.
ट्रेंडिंग घडामोडी –
आशा ‘आयपीएल’ची ! भारतातील ‘ही’ चार शहरे जिथे खेळवता येतील सामने
आता पार्थिव पटेलच म्हणतोय, या यष्टीरक्षकाला द्या विश्वचषकात संधी
चेन्नई किंग्ज याच दिवशी ३ वर्षांपुर्वी खऱ्या अर्थाने मुंबई इंडियन्सच्या खूप मागे पडली