मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भा्रत संघात मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 137 धावांनी पराभूत करत 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे.
आज या सामन्याच्या पाचव्या दिवशी सुरुवातीला पावसाचा व्यत्यय आल्याने खेळाला दुसऱ्या सत्रात सुरुवात झाली. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने 8 बाद 258 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली.
पण काहीवेळातच जसप्रीत बुमराहने अर्धशतक करणाऱ्या पॅट कमिन्सला बाद करत भारताला विजयाच्या समीप पोहचवले. कमिन्सने 114 चेंडूत 63 धावांची खेळी केली. कमिन्स पाठोपाठ नॅथन लायनही इशांत शर्माच्या गोलंदाजीवर बाद झाल्याने भारताने हा सामना खिशात घातला.
भारताकडून या डावात जसप्रीत बुमराह(3/25), रविंद्र जडेजा(3/82), इशांत शर्मा(2/40) आणि मोहम्मद शमी(2/71) यांनी विकेट्स घेतल्या
या सामन्यात भारताने पहिला डाव 7 बाद 443 धावांवर घोषित केला होता. तर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 151 धावांवर संपुष्टात आला. या डावात भारताकडून जसप्रीत बुमराहने 6 विकेट्स घेतल्या.
यानंतर भारताने 8 बाद 106 धावांवर दुसरा डाव घोषित करुन ऑस्ट्रेलियासमोर पहिल्या डावातील 292 धावांच्या आघाडीसह 399 धावांचे विजयासाठी आव्हान ठेवले होते.
संक्षिप्त धावफलक:
भारत पहिला डाव: 7 बाद 443 धावा (घोषित)
ऑस्ट्रेलिया पहिला डाव: सर्वबाद 151 धावा
भारत दुसरा डाव: 8 बाद 106 धावा (घोषित)
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव: सर्वबाद 261 धावा
सामनावीर: जसप्रीत बुमराह (पहिला डाव – 6 विकेट्स, दुसरा डाव- 3 विकेट्स)
महत्त्वाच्या बातम्या:
–मेलबर्न कसोटीत पाचव्या दिवशी नक्की पाऊस हजेरी लावणार? वाचा येथे
–शेपूट वळवळलं! टीम इंडियाच सेलीब्रेशन १६ तासांनी लांबलं
–हा आहे यावर्षीचा रिषभ पंतचा सर्वोत्तम झेल, पहा व्हिडिओ