टीम इंडियानं बांगलादेशविरुद्धच्या चेन्नई कसोटीत 280 धावांनी दमदार विजय मिळवला. भारतीय संघाचा धावांच्या बाबतीत बांगलादेशवरील हा सर्वात मोठा विजय आहे. या विजयासह रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघानं एक नवा इतिहास रचला.
टीम इंडियानं प्रथमच कसोटी क्रिकेटमध्ये पराभवापेक्षा जास्त विजयाची नोंद केली आहे. भारतीय संघानं 580 सामन्यांपासून सुरू असलेली मालिका खंडित केली. आता कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियानं जितके सामने गमावले, त्यापेक्षा जास्त सामने जिंकले आहेत. यापूर्वी केवळ ऑस्ट्रेलियाच्या संघानं ही कामगिरी केली आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये आता भारताच्या विजय-पराजयाची टक्केवारी 50 टक्क्यांहून अधिक झाली आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं. चेन्नई कसोटी सामन्यात भारतानं बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केला. हा भारतीय संघाचा कसोटी क्रिकेटमधील 179 वा विजय होता. भारतानं आतापर्यंत खेळलेल्या 580 कसोटी सामन्यांमध्ये 178 सामने गमावले, तर 179 सामने जिंकले आहेत. 222 सामने अनिर्णित राहिले आणि एक सामना बरोबरीत राहिला. याचच अर्थ, 92 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतानं कसोटी क्रिकेटमध्ये पराभवापेक्षा जास्त विजय मिळवले आहेत.
भारतीय संघाला ही कामगिरी करण्यासाठी 580 सामने खेळावे लागले. ऑस्ट्रेलियानं हे कार्य एका सामन्यातच पूर्ण केलं. तर अफगाणिस्तानला 3 सामने लागले. पाकिस्ताननं 16 तर इंग्लंडनं 23 सामन्यात ही कामगिरी केली होती. वेस्ट इंडिजच्या 99 आणि दक्षिण आफ्रिकेच्या 340 कसोटी सामन्यांनंतर त्यांच्या जिंकलेल्या सामन्यांची संख्या हरलेल्या सामन्यांच्या संख्येपेक्षा जास्त झाली होती. न्यूझीलंड, श्रीलंका, झिम्बाब्वे, बांगलादेश आणि आयर्लंडचे संघ अद्याप या टप्प्यापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. या संघाच्या हरलेल्या सामन्यांची संख्या अजूनही जिंकलेल्या सामन्यांच्या संख्येपेक्षा जास्त आहे.
हेही वाचा –
‘तो खूप कठीण…’, रिषभ पंतच्या पुनरागमनाबद्दल बोलताना रोहित शर्मा भावूक
अश्विनची अष्टपैलू कामगिरी, पंतचं ड्रीम कमबॅक; भारत-बांगलादेश कसोटीच्या 5 महत्वाच्या घटना जाणून घ्या
‘हिटमॅन’नं सचिनला मागे टाकलं! जागतिक क्रिकेटमध्ये केली ऐतिहासिक कामगिरी