भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात ३ वनडे, ३ टी२० आणि ४ कसोटी सामन्यांच्या मालिका होणार आहे. पण या दौऱ्यादरम्यान कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पालकत्व रजा घेऊन भारतात परतणार आहे. त्याच्या या निर्णयाबद्दल अनेक प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. आता ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ज्यॉफ लॉसननेही प्रतिक्रिया दिली आहे.
याबद्दल सिडनी मॉर्निंग हेराल्डमध्ये लिहिलेल्या स्तंभात लॉसनने म्हटले आहे की ‘विराट कोहली शिवाय भारतीय संघ कसोटीत खेळणे म्हणजे मागील मालिकेत ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरशिवाय खेळल्या सारखेच आहे. विराट केवळ धावाच करत नाही तर संपूर्ण संघाचा मानसिक दबावही कमी करतो.’
कसोटी मालिकेत भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहे. हा सामना १७ डिसेंबरपासून सुरु होईल. या सामन्यानंतर विराट भारतात येणार आहे, कारण त्याच्या आणि त्याची पत्नी अनुष्का शर्माच्या पहिल्या बाळाचा जन्म जानेवारी २०२१ मध्ये होणार आहेत. त्यामुळे विराटला बीसीसीआयने पालकत्व रजा मंजूर केली आहे.
तसेच लॉसन म्हणाला, ‘मागील वेळेपेक्षा ऑस्ट्रेलिया यावेळी बलाढ्य संघ आहे. त्यांनी इंग्लंड आणि त्यानंतर न्यूझीलंडचा पराभव केला आहे. याशिवाय मागील उन्हाळी हंगामात त्यांनी पाकिस्तानला चांगली टक्कर दिली आहे. नवीन आंतरराष्ट्रीय हंगाम सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर पोहोचला असून फलंदाजीमध्येही त्याच्याकडे भरपूर पर्याय आहेत.’
भारतीय संघाने सन २०१८-१९ ला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत २-१ अशा फरकाने विजय मिळवून इतिहास रचला होता. ऑस्ट्रेलियन भूमीत कसोटी मालिका जिंकणारा भारत पहिला आशियाई संघ ठरला होता. त्या मालिकेत स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर खेळले होते. त्यावेळी त्यांच्यावर चेंडू छेडछाड प्रकरणी बंदी घालण्यात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
आश्चर्यकारक! वॉर्नर कधीच नाही खेळणार बीबीएल? मांडली आपली समस्या
“भारतीय गोलंदाज स्मिथविरुद्ध ही योजना राबवू शकतात, पण…” वनडे मालिकेआधी दिग्गजाने दिली चेतावणी
आयपीएल २०२१ होणार अधिक रोमांचक, एका संघात खेळणार पाच विदेशी खेळाडू?