INDW vs AUSW 1st ODI: भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला गुरुवारपासून (दि. 28 डिसेंबर) सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना वानखेडे स्टेडिअम येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होणार आहे. त्यापूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हिने जिंकली असून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यात हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाकडून अष्टपैलू साइका इशाक (Saika Ishaque) हिने वनडे पदार्पण केले आहे.
आमने-सामने आकडेवारी
भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला (India Women vs Australia Women) संघांची आमने-सामने आकडेवारी पाहायची झाली, तर यात पाहुणा संघाची बाजू मजबूत दिसते. उभय संघ आतापर्यंत वनडेत 50 वेळा आमने-सामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघ फक्त 10 सामने जिंकू शकला आहे, तर उर्वरित 40 सामने ऑस्ट्रेलिया संघाने आपल्या नावावर केले आहेत. भारताची विजयी टक्केवारी ही 20 टक्के, तर ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी 80 टक्के आहे. (India Women have won the toss and have opted to bat against Australia Women)
पहिल्या वनडे सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारतीय महिला संघ-
जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), स्नेह राणा, अमनजोत कौर, रिचा घोष, पूजा वस्त्राकर, रेणुका ठाकूर सिंग, सायका इशाक
ऑस्ट्रेलिया महिला संघ-
फीबी लिचफील्ड, एलिसा हिली (यष्टीरक्षक/कर्णधार), एलिस पेरी, बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, ऍशले गार्डनर, एनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरेहॅम, अलाना किंग, मेगन शट, डार्सी ब्राऊन
हेही वाचा-
लांब केस का ठेवतोय धोनी? विश्वविजेत्या माजी कर्णधाराने स्वत:च केलाय खुलासा; व्हिडिओ पाहून व्हाल खुश
‘आज लोकं कौतुक करतायेत, पण 3-4 महिन्यांपूर्वी शिव्या…’, शतक ठोकल्यानंतर राहुलनं टीकाकारांना झापलं; वाचाच