India Women Team Announced: सोमवारी (दि. 25 डिसेंबर) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 वनडे आणि 3 टी20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा झाली. हरमनप्रीत कौर हिच्या खांद्यावर दोन्ही मालिकेत भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, श्रेयंका पाटील आणि सायका इशाक या दोघींना पहिल्यांदाच वनडे संघात संधी मिळाली आहे.
दुसरीकडे, हरलीन देओल आणि स्नेह राणा या वनडे संघाचा भाग आहेत. कनिका आहुजा आणि मिन्नू मणी यांना टी20 मालिकेसाठी संघात जागा मिळाली आहे.
🚨 NEWS 🚨#TeamIndia’s ODI & T20I squad against Australia announced.
Details 🔽 #INDvAUS | @IDFCFIRSTBankhttps://t.co/7ZsqUFR9cf
— BCCI Women (@BCCIWomen) December 25, 2023
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला वनडे आणि टी20 सामन्यांचे वेळापत्रक.
भारताचा वनडे संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), रिचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, श्रेयंका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक, तितास साधू, पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, हरलीन देओल.
भारताचा टी20 संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), रिचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, श्रेयंका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक, रेणुका सिंग ठाकूर, तितास साधू, पूजा वस्त्राकर, कनिका आहूजा, मिन्नू मणी
भारत शानदार फॉर्ममध्ये
भारतीय महिला संघ (India Women) सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. रविवारी (दि. 24 डिसेंबर) एकमेव कसोटी सामन्यात हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला कसोटीत पहिल्यांदा पराभूत करण्याचा विक्रम घडवला. त्यापूर्वी भारताने इंग्लंडलाही पराभूत केले होते. आता हरमनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पाहुण्या संघाला वनडे आणि टी20 मालिकेतही पराभवाचा धक्का देण्याचा प्रयत्न करेल. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला 28 डिसेंबर, 2023 पासून सुरुवात होईल.
कुठे होतील सामने?
त्यानंतर पुढील दोन्ही वनडे सामने अनुक्रमे 30 डिसेंबर आणि 2 जानेवारी रोजी खेळले जातील. वनडे मालिकेतील सर्व सामने वानखेडे स्टेडिअम (Wankhede Stadium) येथे पार पडतील. त्यानंतर टी20 मालिकेतील सर्व सामने नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे अनुक्रमे 5 जानेवारी, 7 जानेवारी आणि 9 जानेवारी रोजी खेळले जातील. (india women odi and t20i squad against australia announced ind w vs aus w know here)
हेही वाचा-
हिट विक्रम । रोहितला सर्वात मोठा विक्रम मोडण्याची संधी; सेहवागच नाही, तर धोनीलाही टाकू शकतो मागे
पाकिस्तानी क्रिकेटरने रेकॉर्ड्सबद्दल केले चक्क भेदभावाचे आरोप, चाहत्यांनी लक्षात आणून दिली चूक