Rohit Sharma Chance to Break Big Record: भारतीय संघ बलाढ्य दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मंगळवार म्हणजेच 26 डिसेंबरपासून कसोटी सामना खेळणार आहे. 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळला जाणार आहे. अशात या मालिकेत रोहित शर्मा याच्यासाठी दोन भारतीय दिग्गजांचा विक्रम मोडण्याची संधी चालून आली आहे. चला तर, रोहितकडे नेमका कोणता विक्रम मोडण्याची संधी आहे, हे जाणून घेऊयात…
रोहित शर्मा विक्रम रचण्याची संधी
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघातील कसोटी मालिकेत रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याकडे मोठा विक्रम रचण्याची संधी आहे. ती अशी की, तो भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनू शकतो. भारतासाठी कसोटीत सर्वाधिक षटकार (Most Six For India In Test) मारण्याचा विक्रम सध्या वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याच्या नावावर आहे. तसेच, दुसऱ्या स्थानी दिग्गज कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आहे. त्यानंतर रोहितचा तिसरा क्रमांक लागतो.
खरं तर, सेहवागने कसोटीत भारताकडून 90 षटकारांचा पाऊस पाडला आहे. तसेच, धोनीने 78 षटकार मारले आहेत. याव्यतिरिक्त तिसऱ्या स्थानी असलेल्या रोहित शर्मा याच्या नावावर 77 षटकारांची नोंद आहे. अशात, जर रोहितने आणखी दोन षटकार मारले, तर तो धोनीला सहज मागे सोडू शकतो. तसेच, रोहितने या मालिकेत एकूण 14 षटकार मारले, तर तो सेहवागला मागे टाकत भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनेल.
याव्यतिरिक्त या यादीत चौथ्या स्थानी सचिन तेंडुलकर असून त्याने कसोटीत 69 षटकार मारले आहेत. पाचव्या स्थानी असलेल्या कपिल देव यांनी 61 षटकार, तर रवींद्र जडेजा सहाव्या स्थानी असून त्याने 58 षटकार मारले आहेत. विशेष म्हणजे, जडेजाकडेही सचिन आणिि कपिल देव यांचा विक्रम मोडण्याची संधी आहे. त्याला कपिल पाजींचा विक्रम मोडण्यासाठी 4, तर सचिनचा विक्रम मोडण्यासाठी 12 षटकारांची गरज आहे.
कसोटीत भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
90- वीरेंद्र सेहवाग
78 – एमएस धोनी
77 – रोहित शर्मा*
69 – सचिन तेंडुलकर
61 – कपिल देव
58 – रवींद्र जडेजा*
हेही वाचा-
पाकिस्तानी क्रिकेटरने रेकॉर्ड्सबद्दल केले चक्क भेदभावाचे आरोप, चाहत्यांनी लक्षात आणून दिली चूक
ऑस्ट्रेलियाची कर्णधार Alyssa Healy बनली फोटोग्राफर, पण घडली मोठी चूक; पत्रकार परिषदेत केला खुलासा






